जळगाव :- अधिक पैसे कमविण्याच्या मोहात अनेक जण कमाविलेला पैसाही गमावून बसतात. सध्या लोकांना विविध प्रकारचे आमिष देऊन हजारो-लाखो रुपयांमध्ये गंडविले जात आहे.यात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत असून आता अशीच एक घटना जळगाव शहरातून समोर आली आहे.शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवत जळगावातील एका महिलेची तब्बल ९ लाख ८२ हजारांची फसवणूक करण्यात आली. जळगाव सायबर पोलिसांत दाखल या गुन्ह्यात मुंबईच्या चेंबूर परिसरातून एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. अशरफ उमर सय्यद (वय २६, रा. ह. मु. विष्णूनगर, म्हाडा वसाहत, चेंबूर) असे अटक केलेल्या ठगाचे नाव आहे.
नेमका प्रकार काय?
जळगाव शहरातील विद्युत कॉलनी परिसरात राहणाऱ्या महिलेशी २८ नोव्हेंबर २०२३ ते १५ जानेवारी २०२४ या दरम्यान वेगवेगळ्या चार मोबाईल क्रमांकावरून सायबर गुन्हेगारांनी संपर्क केला. यात अपेक्स कंपनीमार्फत शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणावर नफा मिळवून देतो, असे सदर महिलेला सांगितले. महिलेने तयारी दर्शविल्याने त्यांनी महिलेला ॲपेक्स नावाचे ॲप्लिकेशन डाउनलोड करण्याचे सांगून शेअर खरेदी करण्याच्या नावाखाली वेळोवेळी त्यांच्याकडून ऑनलाइन पद्धतीने नऊ लाख ८२ हजार रुपये वेगवेगळ्या बँक खात्यात मागवून घेतले.
दरम्यान अनेक दिवस होऊन देखील नफा आणि मुद्दल मिळाली नाही. यामुळे महिलेला शंका आली. यामुळे फसवणूक झाल्याचे निदर्षनास आल्यावर त्यांनी १६ जानेवारीला जळगाव सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. यानंतर सायबर पोलिसांनी तपास सुरु केला होता. दरम्यान पथकाने संशयित अशरफ उमर सय्यद यास मुबई येथून २४ मार्चला ताब्यात घेतले. न्यायालयाने त्याची पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.
हे पण वाचा
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती
- एरंडोल येथे तालुका व शहर काँग्रेस कमिटीची बैठक संपन्न.
- होय एरंडोलच : अखेर ॲड. आकाश महाजन यांचा प्रयत्नांना यश.
- 80 हजारांची लाच स्वीकारताच एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव सरपंचांसह तिघांना एसीबीने ठोकल्या बेड्या.