छत्रपती संभाजीनगर :- मधून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. यात एक दिवशीच एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. जुने वाद उफाळून आल्याने पार्टीत सहभागी अन्य दोन मित्रांच्या मदतीने चेतन संजय गिरी या तरुणाची तिघांनी मिळून क्रूर हत्या केली. मंगळवारी मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. चिकलठाण्याच्या पुढे बंद पडलेल्या हॉटेलमध्ये दारूची पार्टी सुरू असताना ही घटना घडली.एमआयडीसी सिडको पोलिसांनी संशयित पवन मिसाळ आणि नवनाथ दहिहंडे यांना ताब्यात घेतलं आहे. तर, पेठेनगरचा यश ऊर्फ विनू विनोद सूर्यवंशी याचा रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता.
घटनेत जखमी अमोल ताठे याच्यावर उपचार सुरू आहेत. फायनान्स कंपनीचे रिकव्हरी काम करणाऱ्या चेतनची अमोल आणि नवनाथ दहिहंडेसोबत जुनी मैत्री होती. अमोलने काही महिन्यांपूर्वी जालना रस्त्यावरील हॉटेल सुगरणच्या मागील बाजूस बंद हॉटेलची जागा भाड्याने घेतली होती.सोमवारी त्याने तिथे धूलिवंदनाचे आयोजन केलं. त्यात चेतन, नवनाथ दहिहंडेसह अनेक तरुण, तरुणी सहभागी झाले होते. यावेळी तिघांची प्रॉपर्टीच्या व्यवहारावरून चर्चा सुरू होती.
तेव्हाच त्यांच्यात काही कारणावरून वाद सुरू झाला. यानंतर चेतन आणि दहिहंडे यांच्या धक्काबुक्की झाली. रागात दहिहंडेनं मिसाळ आणि विनोद यांना बोलावून घेतलं. यानंतर हा वाद मिटला. मात्र तिथून पुढे मिसाळ आणि विनोदने दारूच्या बाटल्या आणल्या आणि पार्टी सुरू झाली. पार्टी सुरू असताना विनोदने चेतनसोबत हसत सेल्फीही काढला. फोटो काढल्यानंतर पुन्हा त्यांनी जुना वाद उकरून काढत चेतनला मारहाण सुरू केली. दहिहंडेनं चेतनच्या डोक्यात दारूची बाटली फोडली. विनोदने त्याच्या पोटात चाकू खुपसला. यात प्रचंड रक्तस्त्राव झाल्यानं चेतनच तिथेच मृत्यू झाला. या घटनेत अमोलही जखमी झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतलं आहे.
हे पण वाचा
- 80 हजारांची लाच स्वीकारताच एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव सरपंचांसह तिघांना एसीबीने ठोकल्या बेड्या.
- आजीची शेवटची इच्छा माझ्या अंगावरील सोन्याच्या दागिन्यांसह अंतिमसंस्कार करा.पण चोरट्यांनी साधला डाव,अंत्यसंस्कारानंतर महिलेच्या अस्थींची चोरी.
- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दुय्यम निंबधक कार्यालयात छापा,अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये सापडले पैसे
- महाराष्ट्रातील नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांचे आरक्षण निश्चित
- मुलीचा प्रथम वाढदिवस कन्या बचाव जागर कार्यक्रमाने साजरा