जळगाव । महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाजासाठी शिक्षणाची चळवळ उभी केली आहे. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाजातील वंचित दुर्लक्षित घटकांसाठी आपण करीत असलेल्या विकास कामांच्या आधारे एक नवा समाज निर्मितीच्या दिशेने पाऊल टाकत आहे यातून समाजात आदर्श विद्यार्थी घडतील असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील यांनी केले.
म्हसावद येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचा जयंती सोहळा साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आरपीआय आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष राजूभाऊ सूर्यवंशी होते. प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंदभाऊ सपकाळे, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील, पवनभाऊ सोनवणे, डॉ. मिलिंद बागुल, प्रा.डॉ. सत्यजित साळवे, सरपंच गोविंदा पवार, जळगाव पंचायत समितीचे माजी सभापती बापू कृष्णा पवार, मिलिंद भाऊ सोनवणे, जळगाव प्रा. राजू पाटील, बापू धनगर, शितल चिंचोरे, समाधान चिंचोरे उपस्थित होते. सुरुवातीला तथागत गौतम बुद्ध , महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले.
अध्यक्ष राजूभाऊ सूर्यवंशी यांनी अध्यक्षीय मनोगतातून जमलेल्या समाज बांधवांना शिक्षणाच्या मार्गाने जाण्याचा महत्त्वाचा उपदेश केला. त्यानंतर महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद भाऊ सपकाळे यांनी देखील शिकलेला समाज हा खऱ्या अर्थाने बदल घडवून आणतो आणि बदल घडवून आणण्याची ताकद फक्त आणि फक्त शिक्षणात आहे, असे महत्त्वाचे विचार मांडले. प्रा. डॉ .सत्यजित साळवे यांनी समाजामध्ये शिक्षणाबद्दलची वाढलेली अनास्था आणि व्यसनाधीनता यांच्यावर प्रकाश टाकला. डॉ .मिलिंद बागुल यांनी देखील महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्याचा उजाळा दिला. पंचायत समितीचे माजी सभापती बापू कृष्णा पवार यांनी देखील गावाच्या एका सांस्कृतिक वाटचालीचा आणि वारसाचा मागवा घेतला. कार्यक्रमात आदर्श सरपंच पुरस्कार मिळाल्याबद्दल म्हसावद गावाचे सरपंच गोविंदा पवार आणि नागसेन फेस्टिवल औरंगाबादचा मिलिंद सन्मान मिळाल्याबद्दल प्रा. डॉ. सत्यजित साळवे या दोघांचाही भव्य नागरी सत्कार करण्यात आला.
नवोदय विद्यालय येथे निवड झाल्याबद्दल बालिका पवारचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक सतीश सूर्यवंशी यांनी केले. सूत्रसंचालन व आभार संजय पवार यांनी मानले. कार्यक्रमाला बापूराव पानपाटील ,विजयकुमार अमित सोनवणे , महेंद्र शिंदे, राजू शिरसाट, प्रवीण शिंदे, अजय गायकवाड , नितीन वानखेडे, संदीप सोनवणे, विकास जाधव, संदीप सोनवणे ,सागर खेडकर ,सागर शिरसाळे, अक्षय केदार ,अमोल बिराडे, सोनू रंधवे ,राज केदार, अविनाश शिरसाळे, कार्तिक जाधव, राज सूर्यवंशी , प्रशांत केदार, रोहित अहिरे, युवराज सपकाळे, अनिल सोनवणे, रितेश तायडे, बंटी जाधव, आर्यन दांडगे ,कल्पेश मुजुमदार, सुमित सूर्यवंशी ,शैलेश सोनवणे, रघुनाथ सोनवणे, भूषण मोरे ,समाधान बिराडे, पवन सकट, अविनाश केदार ,समाधान इंगळे, नितेश वाकडे ,अरुण पवार ,विजय रंधवे, सुधाकर सपकाळे, सुधाकर मेढे डॉ.सुधाकर पाटील,गावातील महिला आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रम संपल्यानंतर भव्य अन्नदानाचा कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान तर्फे आयोजित करण्यात आला होता.
हे पण वाचा
- आजचे राशी भविष्य रविवार दि. ३० नोहेंबर २०२४
- दुर्दैवी घटना! घरात विवाह सोहळ्याची जय्यत तयारी, एकुलत्या एक मुलाच्या हळदीच्या दिवशीच आईने घेतला जगाचा निरोप.
- एस.टी. बसमधून प्रवास करणार्या महिला प्रवाशाच्या अडीच लाखांच्या दागिन्यांवर एस.टी.चालकाचा डल्ला, पोलिसी खाक्यानंतर दिली कबुली.
- धक्कादायक! प्रियकराशी बोलताना अडीच वर्षांची चिमुकली व्यत्यय अन् त्रास द्यायची म्हणून संतापलेल्या आईने निष्पाप लेकीला टेरेसवरुन फेकलं अन्……
- भीषण अपघात! दुचाकी स्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात शिवशाही बस उलटली 11 जणांचा मृत्यू,20 हून अधिक प्रवासी जखमी; मृतांना तातडीने 10 लाख रुपयांची मदत.