जळगाव जिल्ह्यात उष्माघातामुळे ३३ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू, राज्यात ठरला पहिला बळी

Spread the love

जळगाव : यंदा मार्च महिन्यातच उन्हाचे चटके बसू लागले आहेत. राज्यातील अनेक ठिकाणी तापमानाचा पारा ४० अंशावर गेल्याने अंगाची लाहीलाही होत आहे. दरम्यान, हवामान विभागाने राज्यातील काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला असून अशातच जळगावमध्ये उष्माघाताचा पहिला बळी ठरला आहे. अमळनेर तालुक्यातील मांडळ येथे उष्माघातामुळे ३३ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. जितेंद्र संजय माळी (वय ३३) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून या प्रकरणी अमळनेर तालुक्यातील मारवड पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जितेंद्र माळी दुपारपर्यंत रस्त्यावर खमंग विकले आणि त्यानंतर शेतात कामाला गेले होते. शेतातून काम करून येत असताना उन्हाचा फटका बसला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला.

टीम झुंजार