चंदीगड : आई आणि मुलांचं नातं अतिशय खास असतं. यात निस्वार्थी प्रेम, एकमेकांबद्दल आपुलकी आणि काळजी असते. आई आपल्या मुलांसाठी स्वतःच्या जीवाचीही पर्वा न करता काहीही करायला तयार असते.मुलंही आपल्या आईवर जीव ओवाळून टाकतात. मात्र, आता एक अशी घटना समोर आली आहे, ज्याबद्दल वाचून कोणाच्याही पायाखालची जमीन सरकेल. एक मुलगा आपल्या आईला गंगा स्नान करण्यासाठी घेऊन गेला होता, मात्र वाटेत त्याने स्वतःच्या हाताने आईची हत्या केली. या हत्येत मयत महिलेची सून आणि नातू यांनीही साथ दिली.
हरियाणाच्या यमुनानगरमधून ही हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पोलिसांनी तिघांनाही अटक केली आहे. मालमत्तेसाठी ही हत्या करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. ज्या मुलाच्या जन्मानंतर नीलम देवी यांनी लाडू वाटून आनंद व्यक्त केला असेल. तोच मुलगा मालमत्तेच्या लोभाने आंधळा झाला आणि आईचाच जीव घेतला.फरकपूर पोलीस स्टेशनचे एसएचओ जनकराज यांनी सांगितलं की, 2 मार्च रोजी नीलम देवी यांचा नातू सागर आला आणि त्याने आजी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. सागर आणि त्याची आई सुमन हे नीलम देवी यांच्या घराचे कुलूप तोडून काही कागदपत्रे घेऊन गेल्याची माहिती मिळताच पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते.
यानंतर संशयाच्या आधारे तिघांचीही कसून चौकशी केली असता त्यांनी संपूर्ण रहस्य उघड केलं.मृत महिलेचा मुलगा राकेश हा पत्नी आणि मुलासह डेहराडूनमध्ये भाड्याने राहतो. १७ फेब्रुवारीला नियोजित पद्धतीने राकेशने आईला गंगा स्नान करण्याच्या बहाण्याने डेहराडूनला नेलं आणि १८ फेब्रुवारीच्या रात्री मुलगा राकेश, सून सुमन आणि नातू सागर यांनी मिळून ६८ वर्षांच्या महिलेची गळा आवळून हत्या केली. तिघांनीही नीलम देवीचा मृतदेह डेहराडूनच्या विकास नगरमधून वाहणाऱ्या डोलीपूर कालव्यात फेकून दिला. आई जमीन विकून बहिणींना पैसे देईल असा राकेशला संशय होता. याच कारणामुळे त्याने हे धक्कादायक पाऊल उचललं.
हे पण वाचा
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






