लिफ्ट मागण्याच्या बहाण्याने चोरटा बसला दुचाकीवर तरूण शेतकऱ्यास गुंगीचे औषध देऊन सव्वा लाख रुपयांचा ऐवज केला अज्ञात चोरट्यांने लंपास

Spread the love

यावल :- तालुक्यातील दहिगाव येथे राहणाऱ्या तरुणास चुंचाळे फाट्याजवळ गुंगीचे औषध देऊन त्याच्या जवळील सव्वा लाख रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांने घेवुन पोबारा केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.मिळालेली माहीती अशी की, दहिगाव तालुका यावल येथील राहणारे शेतकरी मनोहर महाजन हे आपल्या कडील दुचाकीने जात असतांना लिफ्ट मागण्याच्या बहाण्याने यावल चोपडा रस्त्यावर लुटून केळीच्या बागेत फेकून सव्वा लाख रुपयांची रक्कम अज्ञात चोरट्याने लुट केल्याची घटना १० एप्रिल बुधवार रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला.

दहिगाव येथील शेतकरी मनोहर महाजन यांचे चिरंजीव गिरीश मनोहर महाजन हे चुंचाळ्यात येथील शेत मजुरांना मजुरी देण्यासाठी यावलच्या स्टेट बँकेतून ६५ हजार रुपये काढलेत मजुरीत कमी पडत असल्याने त्याचे हातातील पाच ते सहा ग्रॅमची सोन्याची अंगठी सुद्धा मोडली. सोन्याच्या अंगठीचे पैसे आणि रोख ६५ हजार असे मिळून एक लाखाच्या वर रक्कम त्यांच्याकडे होती.ते दुचाकीने चुंचाळे गावाकडे जात असतांना त्यांना अज्ञात इसमाने दुचाकीवर येऊ दे म्हणून लिफ्ट मागितली.

गिरीश महाजन यांनी त्याला दुचाकीवर बसविले असता चुंचाळे फाट्यात जवळील औषधीच्या कारखान्या जवळ एका केळीच्या बागेत ओढवून नेऊन त्याचे जवळील रक्कम काढून घेतली. दुचाकी ही केळीच्या बागात लपवुन तो अज्ञात चोरटा पसार झाला. घटनेचा प्रकार लक्षात येताच त्याचे वडील व नातेवाईक त्याचा शोध घेण्यासाठी गेले असता तो या केळीच्या बागेत मिळून आला. या संदर्भात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

टीम झुंजार