Viral Video: दिल्लीतील मुखर्जी नगर मध्ये एका तरुणीवर दिवसाढवळ्या चाकूहल्ला केल्याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यात आरोपी तरुणीवर चाकूने हल्ला करताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमन असे आरोपीचे नाव असून तो परिसरातील पेइंग गेस्ट च्या निवासस्थानात स्वयंपाकी म्हणून काम करतो. मुखर्जी नगरमध्ये राहणारी तरुणी जाता- येता त्याची चेष्टा करायची आणि त्याला वेड्यात काढायची, अशी माहिती अमनने पोलिसांना दिली.
तरुणीच्या नेहमीच्या टोमण्यांना वैतागून आरोपीने जवळच्या भाजी विक्रेत्याकडील चाकू घेऊन आणि तरुणीला भोकसला. त्यावेळी एका पादचाऱ्याने मध्यस्थी करून तरुणीला वाचवले. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पीडितेची प्रकृती स्थिर असून ती धोक्याबाहेर आहे. घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी पीडित तरुणीच्या दिशेने धावताना दिसत आहे. तो तिला बळजबरीने जमिनीवर ढकलतो आणि तिच्यावर चाकूने हल्ला करतो. अंदाजे चार ते पाच वेळा तो पीडिताला चाकू भोकसतो.
त्याचवेळी मोटारसायकलवरून आलेल्या एका व्यक्तीने मध्यस्थी करून आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला. समोरच्याने प्रयत्न करूनही आरोपी पळून जातो आणि पुन्हा एकदा तरुणीवर हल्ला करण्यासाठी येतो. त्यावेळी आणखी एक व्यक्ती पीडिताच्या मदतीला धावते. यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून जातो. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार मिळताच पोलिसांनी आरोपीला अटक केली.
हे पण वाचा
- वावडदे येथे डिजिटल बँकिंग व सायबर फसवणूक याबाबत विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन
- जामनेर तालुका दिवाणी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
- अखेर सुलेमानच्या मृत्यू नंतर अनधिकृत कॅफेंवर पोलीस प्रशासनाची टाळे बंद कारवाई/नगर परिषद प्रशासन अनभिज्ञ आहे काय?
- जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथील तरुणाचा टोळक्याच्या जीवघेण्या मारहाणीत मृत्यू
- जागतिक आदिवासी दिनानिमित्त जामनेर तालुक्यात योजना मार्गदर्शन व वृक्षारोपण कार्यक्रम