शिरागड येथील तापी नदीत अंघोळीसाठी गेलेल्या जळगाव येथील १७वर्षीय दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू

Spread the love

यावल :- शिरागड ता. यावल येथे सप्तशृंगी देवीचे मंदिर आहे. तापी नदीच्या काठी सदर मंदिर असून या ठिकाणी दर्शनासाठी येणारे भाविक, भक्त हे तापी नदीत अंघोळ करतात. दरम्यान सोमवारी दुपारी येथे रोहन काशिनाथ श्रीखंडे वय १७ रा. रामानंद नगर जळगाव व प्रथमेश शरद सोनवणे वय १७ राहणार वाघ नगर जळगाव हे दोघे आले होते. त्यांनी दुपारी १ वाजेला देवीचे दर्शन घेतले व त्या नंतर ते तापी नदीत अंघोळ करण्यास गेले दरम्यान दोन वाजेच्या सुमारास अचानक दोघे पाण्याचा अंदाज न आल्याने खोल पाण्यात बुडाले….

तेव्हा तातडीने त्यांना तिथून नागरिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले व यावल ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आले. या ठिकाणी डॉ. प्रशांत जावळे यांनी तपासणी करून दोघांना मृत घोषित केले. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात शरद शिवराम सोनवणे यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सिकंदर तडवी, भरत कोळी करीत आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार