किनगाव येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत आपसात वाद, एकावर चाकू हल्ला, परस्परविरुद्ध ११ जणांविरुद्ध गुन्हे दाखल.

Spread the love

यावल :- तालुक्यातील किनगाव खुर्द येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सुरू असलेल्या मिरवणुकी आपसात वाद झाले. यात मिरवणुकीतील वाहन पुढे नेण्यावरून तसेच ग्रामपंचायत निवडणुकीच्या कारणावरून दोन गटांमध्ये हाणामारी झाली यात एका तरुणावर चाकूने पाठीवर हल्ला करण्यात आला तर दुसऱ्या गटाकडून एका गटाला जबर मारहाण झाली तेव्हा दोन्ही गटाकडून यावल पोलीस ठाण्यात तब्बल ११ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

किनगाव खुर्द ता. यावल येथील शरद बाबुराव अडकमोल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गावात रविवारी रात्री भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची मिरवणूक सुरू होती. ही मिरवणुक किनगाव खुर्द ग्रामपंचायत जवळ आली व मिरवणूकीचे वाहन पुढे नेण्याचे सांगितल्याच्या कारणावरून शरद अडकमोल व त्यांची पत्नी मनीषा अडकमोल या दोघांना राहुल बापू साळुंखे, सारंग बापू साळुंखे, विजय मधुकर साळुंखे, योगेश दिलीप साळुंखे, बापू सिताराम साळुंखे, सिंधुबाई बापू साळुंखे व सोनी अमित सोनवणे या सात जणांनी शिवीगाळ करून मारहाण केली तेव्हा यावल पोलीस ठाण्यात सात जणाविरुद्ध दंगलीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक हरिष भोये, हवालदार नरेंद्र बागुले करीत आहे.

तरूणावर चाकू हल्ला.
सारंग बापू साळुंखे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार किनगाव खुर्द ग्रामपंचायत जवळ ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून शरद अडकमोल, शीलवान अडकमोल, मनीषा अडकमोल व गणेश साळुंखे या चौघांनी राहुल साळुंखे याला शिवीगाळ करून मारहाण केली व त्याच्या पाठीवर चाकूने वार करून दुखापत केली तेव्हा या चार जणाविरुद्ध सारंग साळूंखे याच्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार