जामनेर :- पती अन् पत्नीमध्ये काही दिवसांपूर्वी किरकोळ वाद झाला होता. त्यानंतर पत्नी नऊ महिन्यांच्या मुलीला घेऊन माहेरी गेली. त्या महिोलेचा पती त्या ठिकाणी पोहचला. घरात कोणीच नाही, हे पाहून पोटाच्या मुलीची आणि पत्नीची धारदार शस्त्राने गळा चिरून निर्घृण हत्या केली.त्यानंतर पतीने स्वत:देखील आत्महत्या केली. अंगावर शहारे आणणारी ही घटना जळगाव जिल्ह्यात घडली. या घटनेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. विशाल मधुकर झनके असे खून करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. प्रतिभा झनके आणि दिव्या झनके या मुली आहेत.
क्रूरपणे केली हत्या
जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील देऊळगाव गुजरी येथे ही घटना घडली. ९ महिन्यांच्या बाळासह पत्नीचा धारदार शस्त्राने गळा चिरून विशाल झनके फरार झाला. विशाल झनके हा मलकापूर तालुक्यातील दुधलगाव येथे राहतो. त्याचे सासर देऊळगाव गुजरी येथे आहे. १२ एप्रिल रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास त्याच्या सासराच्या घरात कोणी नव्हते. त्यावेळी विशाल झनके आला. पत्नी आणि नऊ महिन्याच्या मुलीची निर्घृण हत्या केल्यानंतर तो मलकापूर तालुक्यातील दुधलगाव येथे आला. त्या ठिकाणी त्याने स्वत:चे जीवन संपवले.याप्रकरणी फत्तेपूर पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंदवण्यात आला आहे. या हत्याकांडामुळे जळगाव जिल्हा हादरला आहे. विशाल झनके याने हे कृत्य का केले? याची कारण अजून स्पष्ट झाले नाही.
मोठ्या मुलीस ठेवले घरी
खुनाची घटना घडली ते ठिकाण गावापासून लांब होते. यामुळे पोलीस आणि गावकऱ्यांना या घटनेची माहिती लवकर मिळाली नाही. विशाल झनके सासरी आला तेव्हा मोठी मुलगी प्रिया हिला घरी ठेऊन आला. देऊळगाव गुजरीत घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याठिकाणी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. प्रतिभा हिच्या नातेवाईकांनी केलेला आक्रोश हा मन हेलावणारा होता. पोलिसांनी मृतदेह जामनेर येथील ग्रामीण रुग्णालयात नेऊन शवविच्छेदन केले.
हे पण वाचा
- वावडदे येथे डिजिटल बँकिंग व सायबर फसवणूक याबाबत विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन
- जामनेर तालुका दिवाणी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
- अखेर सुलेमानच्या मृत्यू नंतर अनधिकृत कॅफेंवर पोलीस प्रशासनाची टाळे बंद कारवाई/नगर परिषद प्रशासन अनभिज्ञ आहे काय?
- जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथील तरुणाचा टोळक्याच्या जीवघेण्या मारहाणीत मृत्यू
- जागतिक आदिवासी दिनानिमित्त जामनेर तालुक्यात योजना मार्गदर्शन व वृक्षारोपण कार्यक्रम