“मला दोघांसोबत रहायचंय”….नाही तर मी विजेच्या ताराला फाशी घेऊन आत्महत्या करेल देत होती धमकी.
गोरखपूर :-(उत्तर प्रदेश) जिल्ह्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेचे अनैतिक संबंध उघड झाल्याने महिला थेट विजेच्या खांबावर चढली आहे. महिलेला तीन मुले असून तीचे गेल्या सात वर्षापासून प्रेमसंबंध होते.ही बाब पतीला समजताच त्याने विरोध केला. यानंतर महिला आत्महत्या करण्याची धमकी देऊ लागली.महिलेने विजेच्या खांबावरील ताराला फाशी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न देखील केला आहे. यावेळी उपस्थित लोकांनी पोलिसांना संपर्क केला. तसेच वीजपुरवठा खंडित केला.
ही घटना बुधवारी घडली.या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे. ज्यात ती महिला विजेच्या खांबावर आणि स्थानिक लोक तिला खाली उतरण्याची विनंती करताना दिसत आहेत. इंडिया टुडेने दिलेल्या माहितीनुसार महिला तीन मुलांची आई असून तिचे एका तरुणासोबत कथित संबंध होते. त्यांचे विवाहबाह्य संबंध पती राम गोविंद (३५) याला समजल्यानंतर तिने आपल्या प्रियकराला आपल्या पतीप्रमाणेच राहू द्या, अशी मागणी केली. पती गोविंदने याला स्पष्ट नकार दिला.
त्यामुळे महिला घरातून निघून गेल्यावर विजेच्या खांबावर चढून ताराला गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. “विद्युत खांबावर चढलेल्या महिलेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे एक पथक घटनास्थळी पोहोचले. प्रथमदर्शनी हे घरगुती वादाचे प्रकरण असल्याचे दिसते. आम्ही स्थानिक विद्युत विभागाच्या मदतीने महिलेला खाली उतरण्यास तयार केले. महिलेला वाचवण्यात आले आणि तिला तिच्या पतीसह घरी परत पाठवण्यात आले. आमच्याकडे अद्याप कोणतीही तक्रार आलेली नाही,” अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
हे पण वाचा
- माझ्या आयुष्यात पाच ते सहा महिन्यात जे घडलं आहे ते सत्य तुमच्यासमोर मांडून आयुष्य संपवत आहे; सोशल मीडियावर पोस्ट करत एकतर्फी प्रेमातून तरुणाने संपवलं जीवन.
- वैद्यकीय सेवेसाठी कायम सहकार्य:-पालकमंत्री गुलाबराव पाटील; पालकमंत्र्यांचा डॉक्टर असोसिएशन मार्फत सत्कार
- अमळनेर येथे एमपीडीएतून सूटलेल्या,गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यावर अज्ञात व्यक्तिंनी लाठ्या काठ्यांनी केला जीवघेणा हल्ला.
- भडगांव महसुल विभागाची धडक कारवाई; अवैध वाळू चोरी करून वाहतुक करतांना २ डंपर जप्त
- आजचे राशी भविष्य बुधवार दि.५ फेब्रुवारी २०२५