विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त प्रकरणी नऊ जणांविरुद्ध पारोळा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल.

Spread the love

पारोळा :- लखमापूर तालुका सटाणा येथील माहेर असलेल्या व पारोळ्यातील सासर असलेल्या विवाहितेस वेळोवेळी मानसिक व शारीरिक छळ देत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पारोळा पोलिसात नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पारोळा पोलिसात ललित केले रा. लखमापूर जिल्हा नाशिक यांच्या फिर्यादीवरून गेल्या एक वर्षापासून बहीण रोशनी
हिचा कापूस व हळदीचा व्यापारासाठी माहेरून पैसे आणण्याबाबत मानसिक छळ सुरू होता.

दरम्यान तारीख 14 एप्रिल रोजी रात्री सव्वा आठला रोशनीने गळ फास घेतली होती. तिच्या मरणास पती कुंदन अमृतकर, सासरे अरुण अमृतकर, सासू मंगला अमृतकर नणंद रुचिता मोराणकर, अमित मोराणकर, नणंद रूपाली पिंगळे योगेश पिंगळे, काजल कोतकर, प्रसाद कोतकर अशांनी माहेरून कापूस व हळदीचा व्यवसायाकरिता माल ट्रक विकत घेण्यासाठी माहेरून १५ लाख रुपये हुंड्याचे स्वरूपात आणावे म्हणून तिच्या वेळोवेळी शारीरिक व मानसिक छळ करून बहीण रोशनीस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले आहे

म्हणून ता .21 रोजी त्यांच्याविरुद्ध कायदेशीर फिर्याद आहे. यावेळी पारोळा पोलिसात वरील आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक बाळू गीते करीत आहे.

टीम झुंजार