तुझे गाल सपाट झाले आहेत, तू चांगला दिसत नाही, मला तुझ्यासोबत राहायचं नाही सांगून पत्नी गेली माहेरी, पती गेलाथेट एसपी ऑफिस मध्ये मागतोय मदत.

Spread the love

भोपाल : पती-पत्नी आयुष्यभर प्रत्येक परिस्थितीत एकमेकांची साथ देतात. मात्र, कधीकधी हे नातं अशा कारणांमुळे तुटतं, ज्याबद्दल ऐकूनही आश्चर्य वाटतं. सध्या अशीच एक घटना मध्य प्रदेशातून समोर आली आहे.या अजब प्रकरणात पत्नीने आपल्या पतीला यासाठी सोडलं, कारण आता तो चांगला दिसत नाही. पत्नी म्हणाली, की त्याचे गाल आता आतमध्ये गेले आहेत आणि तो आता मला आवडत नाही. त्यामुळे मला आता माझ्या पतीसोबत राहायचं नाही.माहेरी गेलेली ही महिला आता पतीच्या घरी परतण्यास तयार नाही. यामुळे पतीने थेट एसपी ऑफिसमध्ये जात मदत मागितली आहे.

सासरच्या घरून परतल्यानंतर तरुणाने एसपी कार्यालयात तक्रार दाखल करून मदत मागितली. छतरपूर जिल्ह्यातील बामनौरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा अमन अहिरवार याने एसपी कार्यालयात तक्रार अर्ज दिला असून पत्नीला परत आणण्याासाठी पोलिसांची मदत मागितली आहे. अमन सांगतो की, 9 वर्षांपूर्वी गौर झामर या छोट्या गावात राहणाऱ्या राणूसोबत त्यांचं लग्न झालं होतं. लग्नाला 9 वर्षे झाली असून राणू आणि अमन अहिरवार यांना दोन मुलंही आहेत.अमनने सांगितलं, की सर्व काही सुरळीत चाललं होतं पण सुमारे दोन महिन्यांपूर्वी माझी पत्नी मला न सांगता तिच्या आई-वडिलांच्या घरी गेली.

मी तिला घेण्यासाठी गेलो असता, माझ्या सासरच्या लोकांनी मला मारहाण करून पळवून लावलं. एवढंच नाही तर सागर पोलीस ठाण्यात माझ्याविरुद्ध खोटा अर्जही दाखल करण्यात आला.अमनने सांगितलं की, “जेव्हा मी माझी पत्नी राणूला घरी परत येण्यास सांगितलं, तेव्हा तिने नकार दिला आणि सांगितलं की आता तिला माझ्यासोबत राहायचं नाही. कारण विचारलं असता, तिने सांगितलं की, तू आता मला आवडत नाही.” पत्नी म्हणते की, तुझे गाल सपाट झाले आहेत, त्यामुळे मला आता तुझ्यासोबत राहायचं नाही. गेल्या दोन महिन्यांपासून अमन अहिरवार पत्नीला परत आणण्यासाठी प्रयत्न करत होते.

अमन सांगतो, की राणू माझ्यापेक्षा थोडी सुंदर आहे, त्यामुळेच तिला माझ्यासोबत राहायचं नाही. ती तिच्या दाजीच्या सांगण्यावरुन हे सर्व करत आहे. अमन अहिरवार आणि त्यांची पत्नी दोघेही आठवीपर्यंत शिकलेले आहेत. अमन सांगतो की, त्याचा मोठा मुलगा त्याची पत्नी घेऊन गेली आहे, तर लहान मुलगा त्याच्यासोबत आहे. अमनने आरोप केला आहे की, त्याला संशय आहे की त्याच्या पत्नीचे तिच्याच दाजीसोबत प्रेमसंबंध आहेत. अमन अहिरवार आणि रानू यांचा खटला महिला समुपदेशन केंद्रात सुरू आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार