एकतर्फी प्रेमातून युवतीने लग्नास दिला नकार, संतापलेल्या युवकाने युवतीचे फेविक्विकने चिटकवले ओठ; जखमेवर टाकले मिरची पावडर.

Spread the love

भोपाळ (मध्य प्रदेश) : एकतर्फी प्रेमातून युवतीला क्रूर वागणूक देऊन तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना भागातून उघडकीस आली आहे. आरोपीने लग्नासाठी प्रपोज केलं; पण तिने नकार दिल्यावर संतापलेल्या युवकाने तिला बेल्ट व पाइपने मारहाण केली आणि फेव्हिक्विकने तिचे ओठ चिकटवले.या मुलीशी क्रूर वागणाऱ्या आरोपी अयान पठाण याला अटक करण्यात आली आहे. युवतीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक आहे.गुना इथल्या नानाखेडी भागात युवती (वय २३) तिच्या आईसोबत राहते. तिच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे.

घरा शेजारी राहणाऱ्या अयान पठाण याला तिच्याशी लग्न करायचे होते. युवकाने पाठविलेल्या लग्नाचा प्रस्ताव युवतीने नाकारल्यामुळे अयान संतापला होता. युवतीला त्याने कैद करून आपल्या घरात डांबून ठेवले. त्यानंतर अनेक वेळा तिच्यावर जबरदस्ती केली. अयान तिला घराबाहेर पडू देत नव्हता, असे युवतीने सांगितले. युवतीच्या आईने तिचं घर विकल्याचं अयानला समजल्यावर त्याने घर त्याच्या नावाने करण्यासाठी दबाव टाकला. महिनाभर अयान या मुलीवर अत्याचार करत होता. त्यानंतर मंगळवारी रात्री त्याने युवतीला बेल्ट आणि पाण्याच्या पाइपने मारहाण केली.

तिच्या जखमेवर मिरची पावडर टाकली. यामुळे युवती वेदनेने ओरडू लागली. पुढे त्याने तिचे ओठ फेव्हिक्विकने चिकटवले. दुसऱ्या दिवशी युवतीने सुटका केली आणि पोलीस ठाण्यात पोहोचली. युवतीच्या तक्रारीवरून पोलिसांनी अयानविरुद्ध गुन्हा दाखल केला व मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. अयान याला अटक करण्यात आली असून, गुरुवारी (ता. १८) न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्याची तुरुंगात रवानगी केली आहे. युवतीची प्रकृती चिंताजनक आहे. तिच्या संपूर्ण शरीरावर जखमा आहेत. दोन्ही डोळ्यांना सूज आली असून, डॉक्टरांनी मोठ्या प्रयत्नांनी तिचे ओठ उघडले आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.

हे पण वाचा

टीम झुंजार