धक्कादायक! पती, सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने पोटच्या दोन्ही मुलीच्या केला खून,अन टेरेसवरून उडी घेत स्वतःलाही संपविले

Spread the love

आत्महत्येपूर्वी आश्विनीने लिहिलेलं पत्र, माझ्या पतीस माझ्या व मुलीच्या मृतदेहापासून दूर ठेवा ही माझी शेवटची इच्छा आहे

नाशिक : ‘किती वेळा मला मारलं, गळा दाबला, रस्त्यावर बसवलं. माझ्या मुली माझ्यापासून दूर करू शकत नाही. मी माझ्या मुली सोबत घेऊ चालले आहे, आता बस्स तुझ्या फॅमिलीचं करत मी माझी फॅमिलीसोबत घेऊन चालली आहे’ असं म्हणत एका विवाहितेनं आपल्या दोन मुलीची हत्या करून आत्महत्या केल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे.या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमधील आडगाव परिसरात ही घटना घडली आहे.

आश्विनी निकुंभ असं मृत विवाहितेचं नाव आहे. पती आणि सासरच्या त्रासाला कंटाळून आश्विनीने आपल्या दोन मुलीसह आत्महत्या केली. आधी आश्विनीने 2 लहान मुलीची हत्या केली. त्यानंतर इमारतीवरून उडी मारून स्वत:चं आयुष्य संपवलं. विशेष म्हणजे आई आणि मुलीने आत्महत्या करण्यापूर्वी मोबाईलमध्ये व्हिडीओ बनवला होता. अश्विनीने आपल्या दोन्ही मुलींना विष दिलं होतं. त्यानंतर तिने आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा केला. तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

‘मी आश्विनी माझ्या दोन्ही मुलींना घेऊन आत्महत्या करतेय., याला कारण माझा नवरा स्वप्निल निकुंभ आहे. भुतकाळात होऊन गेलेल्या गोष्टीवरून स्वप्निल मला मानसिक आणि शारीरिक त्रास देत होता. त्याच्या त्रासाला कंटाळून मी माझ्या मुलींना आराध्या आणि अगस्थ्याला घेऊन आत्महत्या करत आहे. स्वप्निल त्याच्या फॅमिलीमुळे म्हणजेच त्याचा भाऊ तेजस निकुंभ (शंभु) आणि त्याची बहीण मयुरी सोमवंशी हिच्याशी माझ्ये भांडण झाल्यामुळे अचानक स्वप्निल भुतकाळात घडलेल्या गोष्टींवरून मला ब्लॅकमेल करून त्रास देतोय म्हणून मी माझ्या मुलींना घेऊन आत्महत्या करत आहे.

स्वप्निलने माझ्या आईकडून 6 लाख रुपये घेतले आहे ते त्याने परत द्यावे. आणि ज्या राक्षसामुळे मला आणि माझ्या मुलींना जीव द्यावा लागला म्हणजेच स्वप्निलला माझा किंवा माझ्या मुलींच्या मृतदेहापासून दूर ठेवावे हिच माझी आणि माझ्या मुलीची इच्छा आहे. तसा व्हिडीओ पण मनुने माझ्या मोबाइलमध्ये ठेवला आहे. निकुंभांपैकी कोणीही मला किंवा माझ्या दोन्ही मुलींना हात लावू नये हीच शेवटची इच्छा. माझे आणि मुलींचे अंत्यसंस्कार माझा भाऊ अथर्व किंवा माझी आई राजश्री कौटकर हिने करावा. आम्ही तिघी या जगातून गेल्यावर हे पत्र गायब करण्याचा प्रयत्न होऊ शकतो म्हणून मोबाइल पण चेक करावा. माझ्या आणि माझ्या मुलींचा जीव घेणारा स्वप्निल शंभू आणि ताऊ यांना शिक्षा मिळावी. शेवटचा नमस्कार”

हे पण वाचा

टीम झुंजार