कारंजा घाडगे/प्रतिनिधी
कारंजा (घा):-पक्षाच्या केंद्रीय समितीच्या आदेशानुसार कारंजा तालुक्यातील जिल्हापरिषद व पंचायत समितीच्या सर्व जागांवर संभाजी ब्रिगेड तर्फे आपले उमेदवार लढविण्याचा निर्णय घेतला आहे .औरंगाबाद येथे घेण्यात आलेल्या संभाजी ब्रिगेडच्या केंद्रीय आढावा बैठकीत ठरल्या प्रमाणे यापुढे संभाजी ब्रिगेड महाराष्ट्रातील संपूर्ण छोट्या मोठ्या निवडणुकीमध्ये सहभागी होणार आहे.
राज्यातील जिल्हापरिषद व पंचायत समिती आदी सर्वच स्तरावरील होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये संभाजी ब्रिगेड पूर्ण ताकदीने सहभागी होणार आहे .केंद्रीय पक्ष समितीच्या आदेशाला आधीन राहत वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुक्यात होणाऱ्या जिल्हापरिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये संभाजी ब्रिगेड स्वबळावर निवडणूक लढविणार असल्याचे संभाजी ब्रिगेड चे नेते पियुष रेवतकर यांनी सांगितले .कारंजा तालुक्यातील जिल्हापरिषद व पंचायत समितीच्या सर्व जागेवर पक्षाचे उमेदवार रिंगणात उतरविणार अशी माहिती पियुष रेवतकर यांनी दिली .संभाजी ब्रिगेड ची विचारधारा आणि आजपर्यंत केलेल्या पक्ष जनते समोर जाणार आहे .आज पर्यंत न झालेली विकासकामे हा संभाजी ब्रिगेड चा निवडणूक मुद्दा राहणार आहे . निवडणुकीसाठी पक्षातर्फे उमेदवारासाठी मुलाखती घेण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे .