Viral Video: आग्रा :- सध्या शाळेतील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये शाळेत शिक्षक आणि मुख्यध्यापक यांच्यामध्ये जोरदार हाणामारी झाल्याचं दिसत आहे. ही घटना आग्र्यामधील एका शाळेमधील असल्याची माहिती मिळत आहे.महिला शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्यात शाळेत उशिरा येण्यावरून वाद झाल्याचं दिसत आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती न्युज २४ हिंदीच्या हवाल्यानुसार मिळत आहे.हे संपूर्ण प्रकरण सिकंदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिग्ना पूर्व माध्यमिक शाळेशी संबंधित आहे.
महिला शिक्षिका उशिरा आल्यामुळे मुख्याध्यापक संतापले. अन् त्यांनी शिक्षिकेला मारहाण केली आहे. या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्यात तुफान हाणामारी पाहायला मिळत आहे.व्हिडिओमध्ये मुख्याध्यापक आणि शिक्षकांमध्ये भांडण सुरू असल्याचं दिसत आहे. या भांडणाच्या वेळी तिथे लहान मुलं देखील उपस्थित असल्याचं दिसत आहे. दुसऱ्या व्हिडिओमध्ये मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्यामध्ये जोरदार भांडण होत असल्याचं दिसून येत आहे. या व्हिडिओमुळे आता शिक्षकांच्या वागणुकीवर प्रश्न उपस्थित होत आहे.
शाळा विद्येचं माहेरघर आहे, तिथेच असभ्य वर्तन पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगात फिरत असल्याचं दिसतंय. मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी भांडताना एकमेकांचे कपडे ओढले आहेत. त्यामुळे त्यांचे कपडे देखील फाटले आहेत. या हाणामारीत मुख्याध्यापिकेच्या चालकाचाही हात असल्याचा आरोप होत आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलीय. सोशल मीडियावर लोकं आता या शिक्षकांच्या वागणुकीवर प्रश्न उपस्थित करत आहेत. दोघींवर कारवाई करण्याची मागणी देखील करत आहेत.
हे पण वाचा
- Viral Video: ‘पापा की परी’ रीलच्या नादात धबधब्या जवळ जातांना अचानक……जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका पहा व्हिडिओ.
- महिन्याभरापूर्वीच विवाह झालेल्या नवविवाहित जोडप्याचा बाथरूममध्ये गॅस गिझरच्या गळतीमुळे दुर्दैवी अंत…..
- भुसावळ येथील गोडाऊन मधून 35 लाख रुपयांच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तु चोरीच्या गुन्हा उघडकीस; शिरपूर येथून मुद्देमालासह दोघांना घेतले ताब्यात.
- भूसंपादनाचा वाढीव मोबदला न दिल्याने महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयातील साहित्याची पारोळ्याच्या शेतकऱ्यांनी केली जप्ती.
- ऑनलाईन जुगारामुळे कर्जबाजारी झालेल्या विवाहित तरुणाने दोन वर्षांच्या मुलासह पत्नीला विष दिलं, मग स्वतःनेही संपविले जीवन.