पुणे:- येथील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे कॉलेजमध्ये विद्यार्थीनींचे चोरून व्हिडीओ काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.विद्यार्थीनींच्या हॉस्टेलमध्ये काढलेले हे व्हिडीओ आरोपी तरुणी आपल्या मित्रांना पाठवत होती. या संपूर्ण प्रकरणामुळे कॉलेजमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
आर्या गिरीश काळे आणि विनीत सुराणा अशी आरोपींची नावे आहेत. आरोपी आर्या हिने हॉस्टेलमध्ये चोरून विद्यार्थीनींचे व्हिडीओ शूट केले. ते व्हिडीओ ती मित्र विनीत सुराणा याला पाठवायची. यानंतर हे दोघे सोशल मीडियावर या विद्यार्थीनींचे व्हिडिओ टाकत होते. याप्रकरणी आर्या आणि विनीत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सीईओपी कॉलेजच्या विद्यार्थीनींच्या हॉस्टेलमध्ये मुलींचे कमी कपड्यातले व्हिडीओ आर्या शूट करायची. ते व्हिडीओ मित्र विनीतला पाठवत असे. या प्रकरणी सीईओपी प्रशासनाने चौकशी सुरू केलीय. तसंच पोलिसात दोघांविरुद्ध तक्रार देण्यात आली आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत आर्या गिरीश काळे या विद्यार्थिनीला निलंबीत करण्यात आल्याचे सीईओपी कॉलेजकडून सांगण्यात आले आहे.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






