जळगाव । बोदवड तहसीलदारांसह चौघांना आठ हजारांची लाच स्वीकारताना जळगाव एसीबीच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. या कारवाईमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. तहसीलदार योगेश टोणपे यांच्यासह त्यांचा वाहन चालक, तलाठी व एका खाजगी पंटराचा आरोपींमध्ये समावेश आहे.याबाबत माहिती अशी की, तक्रारदार यांचे वाळू वाहतूकीचा व्यवसाय आहे. अवैधरित्या वाळूची वाहतूक सुरू ठेवण्यासाठी अतिरिक्त पैश्यांची मागणी केली जात असल्याचे समोर आले आहे. वाळूची वाहतूक सुरू ठेवण्यासाठी आठ हजाराची मागणी केली होती. त्यानुसार तक्रारदार यांनी जळगाव लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली होती.
तक्रारीची पडताळणीसाठी जळगावच्या लाचलुचपत विभागाने आज सापळा रचला होता. यावेळी बोदवडचे तहसीलदार योगेश टोणपे यांच्यासह तलाठी, त्यांचा वाहन चालक आणि एका खासगी पंटरला जळगावच्या लाचलुचपत विभागाच्या पथकाने आठ हजाराची लाच घेतांना रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे महसूल विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे.