चाळीसगाव :- तालुक्यातील रोहिणी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीच्या डोक्यात दगड टाकून तिचा निघृण खून केला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. भारताबाई कैलास गायकवाड (३३) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर पती कैलास एकनाथ गायकवाड (३८, रा. ओझर, ता. चाळीसगाव) याला पोलिसांनी अटक केली.
चाळीसगाव तालुक्यातील ओझर येथील रहिवासी कैलास गायकवाड हा पत्नी भारताबाई हिच्यासोबत कामानिमित्ताने रोहिणी या गावी राहत होता. दोघांमध्ये किरकोळ कारणावरून नेहमी वाद व्हायचे. इतकेच नाही तर कैलास हा पत्नी भारतबाई हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला त्रास देत तिच्यासोबत वाद घालायचा. तसेच तिचा छळ करायचा. दरम्यान ५ एप्रिलला रात्री भारताबाई ही पती कैलास गायकवाड व मुलगी योगिता यांच्यासह घरात झोपली होती. यावेळी कैलासने दगड डोक्यात टाकून भारताबाई हीचा खून केला. यानंतर तो फरार झाला होता.
सदर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. भारताबाई हिचा भाऊ गणेश माळी याने दिलेल्या तक्रारीवरून ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याचा दरम्यान सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप परदेशी हे रात्रीच्या गस्तीवर होते. रोहिणी गावात त्यांनी नाकाबंदी करुन वाहनांची तपासणी करीत होते. त्याचवेळी काही तरुणांनी त्यांना या खुनाची माहिती दिली. मारेकरी पती चाळीसगावच्या दिशेने पळाल्याचे सांगताच परदेशी यांनी मुलांना गाडीत बसवून मारेकरी कैलास गायकवाड याचा शोध सुरु केला. तसेच चाळीसगाव पोलिसांच्या डी. बी. पथकाची मदत घेत मारेकरी कैलास गायकवाड याला शोधून ताब्यात घेतले.
हे पण वाचा
- Viral Video:एका बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींमध्ये भररस्त्यात कपडे फाडत झिंज्या उपटत तुफान हाणामारी पहा व्हिडिओ.
- धुमधडाक्यात झाला विवाह संपन्न,लग्नाच्या रात्री नवरीने दुधात नशेचं औषध मिसळून दिले नवऱ्याला अन् १२ लाखाचे दागिने घेवून नवरी फरार,६ जणांचं आयुष्य उद्ध्वस्त
- जळगाव जिल्ह्यात येत्या २७ व २८ डिसेंबर रोजी पावसाचा यलो अलर्ट ! नागरिकांना सतर्कतेचा इशारा
- ViralVideo:सोशल मीडियावर फॉलोअर्स मिळवण्यासाठी अर्धनग्न अवस्थेत अश्लील व्हिडीओ बनविणाऱ्या जोडप्यांना पोलिसांनी केली अटक,अन्..
- दोन तरुणी पडल्या एकमेकींच्या प्रेमात,7.50 लाख ₹ खर्चून, लिंग बदलाची शस्त्रक्रिया पूर्ण होण्या आधीच तरुणीने तरुणीशी लग्न केलं, अन्…