एरंडोल शहरासह तालुक्यातील अल्पसंख्यांक वस्तीत विविध विकासकामांसाठी १ कोटी रुपये निधी मंजूर – आ.चिमणरावजी पाटील

Spread the love

झुंजार प्रतिनिधी । एरंडोल

एरंडोल – शहरातील अल्पसंख्यांक वस्तीतील नागरिक मुलभूत सुविधा अभावी अत्यंत त्रासले होते. या वस्त्यांमध्ये रस्ते, गटारी यांसह इतर मुलभूत सुविधेच्या कामांअभावी नागरिकांना रोजच्या समस्यांना तोंड द्यावे लागत होते. यास्तव आमदार चिमणराव पाटील यांनी मतदारसंघात सुरु केलेला विकासकामांचा धडाका, योग्य पाठपुरावा हे बघता आपली वस्ती देखील या रोजच्या त्रासाने मुक्त व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करत समस्यांचा निराकरणासाठी वेळोवेळी नागरिक आमदार चिमणराव पाटील यांचेकडे मागणी करत होते.

यांची आमदारांनी त्वरित दखल घेत या समस्यांचा निराकरणासाठी पत्रान्वये पाठपुरावा करून कामांना मंजुरी देवून निधी उपलब्ध करून देणेबाबत सुचविले होते. यांची मा.मंत्री महोदयांनी दखल घेत अल्पसंख्यांक विकास विभाग दिनांक ३१ मार्च २०२२ रोजीच्या शासन निर्णयान्वये एरंडोल शहरासह तालुक्यातील अल्पसंख्यांक वस्तीत विविध विकासकामांसाठी १ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.

यामुळे एरंडोल शहरासह तालुक्यातील अल्पसंख्यांक वस्तींच्या सुधारणेसाठी मोठी मदत होणार असल्याने मतदारसंघातील मुस्लीम बांधवांनी समाधान व्यक्त करत आमदार चिमणराव पाटील यांचे आभार मानले आहेत.

टीम झुंजार