प्रियकराविरुद्ध पोलिस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल.
मारेगाव :- प्रेमाच्या आणाभाका एकीसोबत आणि लग्न दुसरीसोबत लावणाऱ्या प्रियकराविरोधात अखेर फसवणूक झालेल्या प्रेयसीने पोलिसात तक्रार दाखल केली. ही घटना मारेगाव तालुक्यातील रोहपटची असून या घटनेने प्रेयसीला मोठा धक्का बसला आहे.एका अल्पवयीन मुलीचे सगणापूरच्या एका २३ वर्षीय युवकाशी सूत जुळले. २०१९ मध्ये जुळलेले हे प्रेम दिवसेंदिवस बहरत गेले.
भेटीगाठी वाढल्या. अशातच ८ नोव्हेंबर २०२२ ला आरोपीने या मुलीला घरी बोलावून १६ नोव्हेंबर २०२२ ला घराचा वास्तू आहे. त्यादिवशीच आपण लग्न करू असे सांगून आठ दिवस लैंगिक अत्याचार केला. त्यानंतरही तो लग्नाचे आमिष देऊन वारंवार तिचे शोषण करीत याची कोठेही वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकी देत होता.गावातील ग्रामसेवक आणि आशा वर्कर यांनी १८ वर्षे पूर्ण झाल्याशिवाय तुम्हाला लग्न लावता येत नाही असे सांगितले. तसेच १८ वर्षे पूर्ण झाल्यावर याच मुलीशी लग्न करेन असे मुलाकडून कबूलही करून घेतले होते.
मुलगी दुसऱ्या गावाला राहत असल्याचा फायदा घेऊन प्रियकराने १ मे २०२४ ला दुसèया मुलीशी लग्न केले. हे कलताच त्या मुलीला धक्काच बसला. २०१९ पासूनचे प्रेम एकाएकी तुटून पडले. घेतलेल्या आणाभाका हवेतच विरून गेल्या. विमनस्क झालेल्या प्रेयसीने अखेर प्रियकराविरुद्ध मारेगाव पोलिस ठाण्यात तक्रार केली.यावरून मारेगाव पोलिसांनी आरोपी प्रियकराविरुद्ध कलम ३७६ (२) (प), ५०६, बाललैंगिक अत्याचारापासून संरक्षण कलम ३ (अ), ४, ५ (आय) ६ नुसार गुन्हा दाखल केला असून अधिक तपास ठाणेदार शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.
हे पण वाचा
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती
- एरंडोल येथे तालुका व शहर काँग्रेस कमिटीची बैठक संपन्न.
- होय एरंडोलच : अखेर ॲड. आकाश महाजन यांचा प्रयत्नांना यश.
- 80 हजारांची लाच स्वीकारताच एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव सरपंचांसह तिघांना एसीबीने ठोकल्या बेड्या.