एरंडोल :- तालुक्यातील धारागिर शिवारात इलेक्ट्रिक शॉर्टसर्किटमुळे शेतातील ठिबक नळ्या व मकाचा चारा जळून खाक झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. या घटनेत शेतकऱ्याचे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या नुकसानची एम एस ई बी ने भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांने केली आहे. दरम्यान घटना घडून देखील संबंधित ज्युनिअर अभियंता घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी अद्याप पर्यंत पोहचले नसल्याने शेतकऱ्यांन मधुन संतप्त भावना व्यक्त केली जात आहे.
पळासदळ शिवारातील गट क्रमांक 39 /1 एक मधून कृषी पंपाची वीज वाहिनी ही गेली आहे.
त्या वीज वाहिनीचे अचानक तारा एकमेकांना स्पर्श झाल्याने चिंगारी उडून गव्हाचे रिकामे शेत हे पेटले त्यासोबतच अधिकचा वारा सुटलाने गव्हाचे शेताने सर्वत्र पेट घेतला. वारामुळे ती आग शेताच्या बांधलागत धारागिर शिवारातील गट क्रमांक 71 या शेता पर्यंत जाऊन पोहोचली. त्याठिकाणी पडलेला मकाचा चाराकुट्टी व पंधरा ते सोळा बंडल भरतील इतक्या ठिबक च्या नळ्या या आगीत सापडल्या, आग आटोक्यात आणण्यासाठी शेजारील शेतकरी हारून शेख आयुब, अण्णा ठाकूर, पिंटू पाटील, सुभाष बामणे, विठोबा महाजन आदी शेतकऱ्यांनी मोठे प्रयत्न केले.
परंतु वारामुळे आग आटोक्यात न आल्याने गट क्रमांक 71 मधील शेतकऱ्यांच्या ठिबकच्या नळ्या व ते तीन चार ट्रॅक्टर भरतील एवढी मक्याची कुट्टी पूर्ण जळून खाक झाली आहे. यात जवळपास शेतकऱ्याचे लाखाचे नुकसान झाले आहे. संबंधित घटनेचा तलाठी व पोलीस पंचनामा करण्यात आला आहे. दरम्यान घटनेची संबंधित वायरमन योगेश महाजन यांनी त्याचवेळी पाहणी करून वरिष्ठांना माहिती दिली आहे. परंतु संबंधित ज्युनिअर इंजिनीयर घटनास्थळाची पाहणी न करता आपली मगरोरी व्यक्त करत आहे.
परिणामी परिसरातील शेतकऱ्यांकडून संतप्त भावना व्यक्त केली जात आहे. या पूर्वी देखील या भागातील डॉ अमृत पाटील यांच्या शेतात अशाच शॉर्टसर्किटमुळे आग लागली होती त्यावेळी देखील उपस्थित शेतकऱ्यांनी ती आग आटोक्यात आणून पेरूचा मळा वाचवण्यात मोठा हातभार लावला होता. या डीपीवर असे प्रकार यापूर्वी अनेकदा घडले असून वारंवार घडत आहे. परिणामी मान्सून पूर्व एम एस इ बी कामे करावी अशी मागणी होत आहे. दरम्यान ज्युनिअर इंजिनियर कर्तव्यात करीत असल्याने सहाय्यक अभियंता श्री महाजन यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेऊन अभियान संबंधित त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे.
हे पण वाचा
- Viral Video: दोन दरोडेखोर पिस्तुलाचा धाक दाखवून दागिने लुटणार इतक्यात दुकानदार व कर्मचाऱ्यांनी अस केलं की चोरांचा डाव उलटवला.
- पोलखोल! बनावट एडिशनल एसपी बनून आली पोलीस ठाण्यात पोलिसांनी केलं सॅल्यूट;पण एक छोटीशी चूक होताच पोलिसांनी केला महिलेचा पर्दाफाश.
- एरंडोल येथे संविधान दिवस उत्साहात संपन्न; “घर घर संविधान” चळवळ यशस्वी करण्याचा संकल्प
- धक्कादायक! आईने घरातील पत्र्याला घेतला गळफास,तर दोन चिमुकली आढळली पाण्याच्या बॅरेलमध्ये,कारण अस्पष्ट.
- आजचे राशी भविष्य गुरूवार दि. २८ नोहेंबर २०२४