लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला बायकोला सरप्राईज देण्यासाठी दिली भेटवस्तू,परंतु तिने मागितला घटस्फोट कारण ऐकून तुम्हालाही धक्का बसेल वाचा.

Spread the love

जयपूर :- पती-पत्नीमध्ये घटस्फोट होण्यामागे वेगवेगळे कारणे असू शकतात. अनेकदा वागणूक, राग, इगो यामुळे घटस्फोट होतात. पण राजस्थानमध्ये घटस्फोटाच्या एका अनोख्या प्रकरणाची खूप चर्चा होत आहे. जयपूरमधल्या या घटनेनं अनेकांनी डोक्याला हात मारुन घेतला आहे. पतीने लग्नाच्या पहिला वाढदिवस होता म्हणून मोठ्या उत्साहाने बायकोला सरप्राईज देण्यासाठी पतीला भेटवस्तू दिली. पम तिने तेव्हाच लगेच पतीकडे घटस्फोट मागितला. ही गोष्ट ऐकताच पतीला सुरुवातीला ती मस्करी करतेय असे वाटले. पण नंतर जेव्हा तिने घटस्फोटाचे कारण सांगितले तेव्हा पतीला ही धक्का बसला.

लग्नाच्या वाढदिवशी मागितला घटस्फोट

महिलेच्या घटस्फोटाचं कारण सांगितल्यावर त्यांचे कुटुंब देखील थक्क झाले. मिळालेल्या माहितीनुसार, जयपूरच्या एका तरुणाचा वर्षभरापूर्वी प्रतापगडमध्ये विवाह झाला होता. वर्षभरापूर्वी तो त्यांच्या पत्नीसोबत जयपूरला पोहोचला होता. लग्नाचे विधीही पार पडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी वधूने सांगितले की एक वर्षानंतर ती परस्पर संमतीने घटस्फोट घेईल.

यावर पतीला वाटले की ती असेच बोलत आहे. घरच्यांनीही तिला गांभीर्याने घेतले नाही. पण एक वर्षानंतर जेव्हा ते खरे ठरले तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसला.लग्नाला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या आनंदात पती एकीकडे पत्नीला सरप्राईज देण्याचा वितार करत होता. तर पत्नी घटस्फोट घेण्याचा विचार करत होती. पत्नीने असे सरप्राईज दिले की पतीला विश्वासच बसेना. नवऱ्याला वाटलं की बायको त्याच्याशी मस्करी करतेय पण यावर पतीने पत्नीला असे का करायचे आहे असे विचारले आणि त्याला असे उत्तर मिळाले की कोणीच अपेक्षा केली नसेल.

कारण ऐकून पतीला बसला धक्का

पत्नीने सांगितले की, ती यूपीएससी परीक्षेची तयारी करत आहे. पण जर तिने घटस्फोट घेतला तर तिला यूपीएससी परीक्षेत घटस्फोटाच्या कोट्याचा लाभ मिळेल. एवढेच नाही तिने फक्त या गोष्टीसाठीच लग्न केल्याचे सांगितले. त्यामुळे पतीला मोठा धक्का बसला. आपली मोठी फसवणूक झाल्याचे पतीला कळले. त्याने मात्र घटस्फोट देण्यास नकार दिला आहे.

पत्नीने पतीला घटस्फोट दिला नाही तर खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली. त्यानंतर पीडित पतीने पोलिसांची मदत घेण्याचा प्रयत्न केला. तक्रार देण्यासाठी त्यांनी पोलीस स्टेशन गाठले पण एफआयआर नोंदवला गेला नाही. यानंतर तो कोर्टात पोहोचला. तरुणांच्या विनंतीवरून अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांनी एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले. त्यानंतर आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

हे पण वाचा

टीम झुंजार