जळगाव : नुकताच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मंत्रालय क्लार्क परीक्षेचा निकाल जाहीर केला. यामध्ये अपयश आलेल्या तरुणाने जीवन संपवल्याची धक्क्दायक घटना जळगावमधील शिरसोली इथं घडलीय.तीन गुण कमी मिळाल्याने तरुणाने टोकाचं पाऊल उचलल्याने खळबळ उडाली आहे. आकाश भिमराव बारी असं २५ वर्षीय तरुणाचं नाव आहे. त्याने गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, एमपीएससीच्या क्लर्कच्या परीक्षेत केवळ तीन गुण कमी पडल्याने, जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील विद्यार्थ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आकाश भिमराव बारी (वय-२५) असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव आहे.आकाश गेल्या काही वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता.
गुरुवारी रोजी एमपीएससीतर्फे घेण्यात आलेल्या मंत्रालयीन क्लर्क पदासाठीचा परीक्षेच्या निकाल जाहीर झाला. या परीक्षेमध्ये आकाशला तीन गुण कमी पडल्याने त्याची संधी हुकली. या अपयशामुळे नैराशातून आकाशने रात्री त्याच्या घरातील एका खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. आकाशच्या आत्महत्येमुळे त्याच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
हे पण वाचा
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती
- एरंडोल येथे तालुका व शहर काँग्रेस कमिटीची बैठक संपन्न.
- होय एरंडोलच : अखेर ॲड. आकाश महाजन यांचा प्रयत्नांना यश.
- 80 हजारांची लाच स्वीकारताच एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव सरपंचांसह तिघांना एसीबीने ठोकल्या बेड्या.






