चंदीगड (हरियाणा): एका वहिनीने अनैतिक संबंधातून दीराची हत्या केली. पोलिसांनी महिलेला आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. महिलेने तपासादरम्यान आपला नवरा नामर्द असल्याचे सांगितल्याने धक्कादायक खुलासा उघड झाला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. शेखपुरा गावात काही दिवसांपूर्वी आजम खान (वय १८) या युवकाचा मृतदेह एका तलावात सापडल्यानंतर पोलिस पुढील तपास करत आहेत.
पोलिसांनी कुटुंबातील काही लोकांची चौकशी केली असता पोलिसांच्या संशयाची सुई शेजारी राहणाऱ्या रोहित भोवती फिरली. पोलिसांनी रोहितची कसून चौकशी केली असता याप्रकरणातील सत्य समोर आले. रोहित आणि तमन्ना (मृत व्यक्तीची वहिनी) यांचे प्रेमसंबंध होते. दोघांमध्ये अनेकदा अवैध संबंधही निर्माण झाले होते. तमन्ना ही आझम खानची वहिनी आहे आणि आझम खानचा भाऊ गफ्फार याचे लग्न 6 वर्षांपूर्वी तिच्याशी झाले होते.
दोघांनीही एकदा गफ्फारला मारण्याचा कट रचला होता. पण, तो कट यशस्वी झाला नव्हता. तमन्नाच्या घरी कोणी नसताना तमन्नाने रोहितला घरी बोलावले आणि दोघांमध्ये अवैध संबंध निर्माण झाले. दीर आझम खान अचानक घरी आला आणि त्याने दोघांना नको त्या अवस्थेत पकडले. आझम खानने कोणाला सांगू नये, म्हणून त्या दिवशी रोहितने स्वतःच्या हाताची नसही कापून घेतली. पुढे रोहित आणि तमन्नाने मिळून आझम खानच्या हत्येचा कट रचला. रोहितने आझमला बाहेर बोलावले आणि चाकूने त्याच्यावर वार केले.
आझम खानची हत्या केल्यानंतर रोहितने त्याचा मृतदेह तलावात फेकून दिला होता. पोलिसांनी मृतदेह सापडल्यानंतर या प्रकरणाचा कसून तपास सुरु केला होता. तमन्नाने पोलिस चौकशीत सांगितले की, ‘पती गफ्फार लैंगिकदृष्ट्या कमकुवत (नपुंसक) असल्याने ती रोहितच्या जवळ आली. माझे हे मूल देखील रोहितचे आहे.’ तमन्ना आणि रोहितला अटक करण्यात आली असून, पोलिस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.
हे पण वाचा
- Viral Video: दोन दरोडेखोर पिस्तुलाचा धाक दाखवून दागिने लुटणार इतक्यात दुकानदार व कर्मचाऱ्यांनी अस केलं की चोरांचा डाव उलटवला.
- पोलखोल! बनावट एडिशनल एसपी बनून आली पोलीस ठाण्यात पोलिसांनी केलं सॅल्यूट;पण एक छोटीशी चूक होताच पोलिसांनी केला महिलेचा पर्दाफाश.
- एरंडोल येथे संविधान दिवस उत्साहात संपन्न; “घर घर संविधान” चळवळ यशस्वी करण्याचा संकल्प
- धक्कादायक! आईने घरातील पत्र्याला घेतला गळफास,तर दोन चिमुकली आढळली पाण्याच्या बॅरेलमध्ये,कारण अस्पष्ट.
- आजचे राशी भविष्य गुरूवार दि. २८ नोहेंबर २०२४