यावल :- तालुक्यातील किनगाव या गावातील एका ३२ वर्षीय महिलेच्या घरात डांभुर्णी येथील एकाने अनाधिकृतपणे प्रवेश केला आणि मी तुला पैसे परत करणार होतो. तू माझ्याबद्दल पोलीस ठाण्यात तक्रार का दिली. तू मला आवडते, माझ्याशी संबंध ठेव असे सांगून त्याने या महिलेच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत तिचा विनायभंग केला. ही घटना दिनांक १८ मे शनिवार रोजी रात्री नऊ वाजता घडली होती.
तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात एका विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे व संशयीताला पोलिसांनी अटक केली आहे. किनगाव ता. यावल या गावात ३२ वर्षीय महिला राहते. या ३२ वर्षीय महिलेच्या घरात मुकुंदा गणेश भंगाळे रा. डांभुर्णी हा आला व त्याने सदर महिलेशी वाद घातला आणि तू माझ्याविरुद्ध पोलिसात का तक्रार दिली. मी तुझे पैसे परत करणार होतो. असे सांगून तू मला खूप आवडते. तू माझ्याशी संबंध ठेव असे सांगितले आणि तिचा हात पकडून तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले
व या महिलेचा विनयभंग केला. तेव्हा या महिलेच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात मुकुंदा भंगाळे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार नरेंद्र बागुले करीत आहे.
हे पण वाचा
- 80 हजारांची लाच स्वीकारताच एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव सरपंचांसह तिघांना एसीबीने ठोकल्या बेड्या.
- आजीची शेवटची इच्छा माझ्या अंगावरील सोन्याच्या दागिन्यांसह अंतिमसंस्कार करा.पण चोरट्यांनी साधला डाव,अंत्यसंस्कारानंतर महिलेच्या अस्थींची चोरी.
- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दुय्यम निंबधक कार्यालयात छापा,अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये सापडले पैसे
- महाराष्ट्रातील नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांचे आरक्षण निश्चित
- मुलीचा प्रथम वाढदिवस कन्या बचाव जागर कार्यक्रमाने साजरा