जळगाव जिल्ह्यातील नागरिकांना पुढील चार दिवस उष्णतेची झळ, राज्यात सर्वाधिक तापमान जळगांवचे

Spread the love

जळगाव:- राज्यातील सर्वाधिक तापमान जळगावात दिसून आले आहे गेल्या ७-८दिवसापासून खान्देशात उष्णतेची लाट आली आहे. मंगळवारी तर जळगावात हंगामातील सर्वाधिक ४५.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.मंगळवारी जळगाव शहराचे तापमान संपूर्ण राज्यात सर्वाधिक होतं दरम्यान पुढील चार दिवस जळगाव जिल्ह्यातील नागरिकांना उष्णतेची झळ सोसावी लागेल असेच चित्र दिसत आहे.

लाटेपासून दिलासा मिळण्याची शक्यता नाही. तसेच पारा ४५ ते ४६ अंशांपर्यंत जाण्याचाही अंदाज ‘आयएमडी’ने व्यक्त केला आहे.राजस्थान, गुजरातकडून येणाऱ्या उष्ण व कोरड्या वाऱ्यांमुळे तापमान वाढतच जात आहे. त्यातच वातावरणात आर्द्रतेचे प्रमाणदेखील ६० टक्क्यांपेक्षा जास्त असल्याने, मोठ्या प्रमाणात उकाडा देखील जाणवत आहे.

पुढील आठवड्यात जिल्ह्यात पावसाची शक्यता

गेल्या आठवड्यात जळगाव जिल्ह्यात व परिसरात पाऊस होऊन गेला आहे. त्यानंतर आता वातावरण पुन्हा कोरडे झाले आहे. त्यामुळे गुजरात, राजस्थानकडून रोष्णारे उष्ण वारे सक्रिय झाले आहे. त्यामुळे पारा वाढला आहे. आठवडाभर तापमान वाढलेले राहिल. मात्र त्यानंतर म्हणजेच पुढील आठवड्यात जळगाव जिल्ह्यात पाऊस होऊ शकतो. त्यामुळे तापमानात पुन्हा घट होईल. २६ मे नंतर मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला.

हे पण वाचा

टीम झुंजार