जळगाव : शहरातील कालिंका माता मंदिर परिसरात किशोर अशोक सोनवणे (वय ३३, रा. बालाजी मंदिराच्या मागे, कोळी पेठ) या तरुणाचा जुन्या वादातून निघृण खून केल्याची घटना बुधवार दिनांक २२ मे रोजी १०.४५ वाजेच्या सुमारास घडली. हा प्रकार हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून, पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.
प्राप्त माहिती अशी की,किशोर सोनवणे हा रात्री कालिंकामाता मंदिर परिसरातील हॉटेल येथे जेवणासाठी गेला होता. त्याच्यावर पाळत ठेवत इतर तरुणांना संशयित आरोपींनी बोलावून घेतले. हॉटेलमध्ये किशोर सोनवणे याच्यावर रात्री १०.४५ वाजेच्या सुमारास धारदार शस्त्राने वार करून निघृण खून करण्यात आला. हा प्रकार हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी घटस्थळी धाव घेतली. दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले असून, इतर मारेकरी फरार झाले आहेत. या खून प्रकरणात अजून किती जण आहे. याची चौकशी सुरू आहे.
हे पण वाचा
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती
- एरंडोल येथे तालुका व शहर काँग्रेस कमिटीची बैठक संपन्न.
- होय एरंडोलच : अखेर ॲड. आकाश महाजन यांचा प्रयत्नांना यश.
- 80 हजारांची लाच स्वीकारताच एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव सरपंचांसह तिघांना एसीबीने ठोकल्या बेड्या.