यावल : तालुक्यातील विरावली येथील रहिवासी एका ३५ वर्षीय तरूणाने भुसावळ जवळील तापी नदीच्या पुलावरून उडी घेवुन आत्महत्या केली ही घटना शुक्रवारी दुपारी घडली असुन या प्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
विरावली ता.यावल येथील रहिवासी शंकर मदन रल वय ३५ हा तरूण दुचाकीव्दारे भुसावळ शहरा बाहेरील तापी नदीच्या पुलावर गेला व पुलावर दुचाकी लावुन त्याने थेट नदी पात्रात उडी घेतली हा प्रकार नागरीकांच्या निर्दशनास येताचं त्यांनी पोलिसांना माहिती दिली व
पोलिसांनी दुचाकीवरून शंकर रल यांच्या कुटुंबास माहिती दिली तेव्हा घटनास्थळी रल यांच्या नातलगांनी जावुन मृतदेह यावल ग्रामिण रूग्णालयात आणला येथे डॉ. तुषार सोनवणे, डॉ. सौरव भुताने यांनी तपासणी करून रल यास मृत घोषीत केले तेव्हा या प्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास पोलिस निरिक्षक प्रदिप ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संदीप सुर्यवंशी, पोलिस नाईक किशोर परदेशी करीत आहे मयत यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. त्याने आत्महत्या का केली हे कळु शकले नाही.
हे पण वाचा
- 80 हजारांची लाच स्वीकारताच एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव सरपंचांसह तिघांना एसीबीने ठोकल्या बेड्या.
- आजीची शेवटची इच्छा माझ्या अंगावरील सोन्याच्या दागिन्यांसह अंतिमसंस्कार करा.पण चोरट्यांनी साधला डाव,अंत्यसंस्कारानंतर महिलेच्या अस्थींची चोरी.
- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दुय्यम निंबधक कार्यालयात छापा,अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये सापडले पैसे
- महाराष्ट्रातील नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांचे आरक्षण निश्चित
- मुलीचा प्रथम वाढदिवस कन्या बचाव जागर कार्यक्रमाने साजरा