पाली (राजस्थान):- जिल्ह्यातून एका व्यक्तीने आपल्या पत्नीला बेदम मारहाण करत तिला ठार केलं. कारण त्याला संशय होता की, पत्नीने त्याच्या वडिलांच्या खिशातून पैसे काढून घेतले होते. आरोपीने बेदम मारहाण करत आपल्या पत्नीची हत्या केली.त्यानंतर त्याने आपला गुन्हा लपवण्यासाठी हत्येला रस्ते अपघाताचे रुप देण्याचा प्रयत्न केला. त्याने पत्नीला रुग्णालयात दाखल केले. तेथे महिलेच्या अंगावरील जखमा पाहून डॉक्टरांनी पोलिसांना बोलावला. पोलीस घटनास्थळी दाखल होताच, हत्येचा उलगडा झाला. पोलिसांनी सांगितले की, ही घटना पाली शहराच्या टीपी नगरपोलीस ठाणे क्षेत्रातील सुंदर नगर विस्तार कॉलनीमधील आहे. येथे आरोपी दिलीप नेत्याची पत्नी यशोदा (वय २८) हिची बेदम मारहाण करून हत्या केली.
आरोपी दिलीपचे वडील गिरधारी लाल यांच्या खिशातून पैसे गायब झाले होते. याबाबत गिरधारी यांनी आपला मुलगा दिलीपकडे तक्रार केल्यानंतर दिलीपला आपल्या पत्नीवर संशय आला. त्यांनी पत्नीला खोलीत बंद करून तिच्याकडे चौकशी केली. मात्र पैसे न मिळाल्याने रागाच्या भरात त्याने पत्नीला लाथा-बुक्यांनी व काठीने बेदम मारहाण केली. यातच तिचा मृत्यू झाला.पत्नीला मारल्यानंतर आरोपी दिलीपने रक्त लागलेले कपडे बदलले. महिलेला आपल्या कारमध्ये घालून रुग्णालयात घेऊन गेला. तेथे डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित केले. मृत महिला यशोदा हिची आई शांता यांच्या तक्रारीनुसार सासू रूपाली, सासरे गिरधारी लाल, दीर गोपाल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
नातेवाईकांकडून अपघाताचा बनाव –
अतिरिक्त पोलीस अधीक्षक विपिन शर्मा यांनी सांगितले की, चावडिया हिंमतनगर, गुजरात निवासी चेनाराम प्रजापत यांची मुलगी यशोदा हिचा विवाह ९ वर्षापूर्वी लांबिया गावातील दिलीप प्रजापत याच्याशी झाला होता. दोघांना एक मुलगा व एक मुलगी आहे. आरोपी दिलीप बेंगळुरूमध्य राहते. तेथे स्टीलचे रेलिंग बनवण्याचे काम करतो. स्कूलला सुट्ट्या असल्याने महिला मुलांना घेऊन सासरी आली होती. सासरच्या लोकांनी हा अपघात असल्याचे सांगितले होते, मात्र संपूर्ण शरीरावर मारहाणीचे निशाण असल्याने डॉक्टरांना संशय आला व त्यांनी पोलिसांना सूचना दिली.
आरोपी पती आपल्या पत्नीला घेऊन रुग्णालयात गेले. तेथे डॉक्टरांना दिसले की, महिलेचे डोळे सुजले होते, डोक्यातून रक्त येत होते. डॉक्टरांना संशय आल्याने त्यांनी पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी घटनास्थळी येऊन कसून चौकशी केली असता त्यांना संपूर्ण प्रकार सांगितला. पोलिसांनी सांगितले की, दिलीपचा यशोदाशी २०१६ मध्ये विवाह झाला होता. त्यांना २ मुलेही आहेत. मृत महिला १३ दिवसापूर्वीच आपल्या माहेरहून सासरी आली होती. पोलिसांनी आरोपी पती दिलीप प्रजापत याच्यासह कुटूंबातील सर्व सदस्यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.आरोपी दिलीपने पत्नीला इतकी मारहाण केली की, तिचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर कुटूंबात खळबळ माजली. त्यांना ही हत्या लपवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी रुग्णालयात नेऊन डॉक्टरांना सांगितले की, रस्ते अपघातात यशोदा जखमी झाली आहे.
हे पण वाचा
- धक्कादायक! आईने घरातील पत्र्याला घेतला गळफास,तर दोन चिमुकली आढळली पाण्याच्या बॅरेलमध्ये,कारण अस्पष्ट.
- आजचे राशी भविष्य गुरूवार दि. २८ नोहेंबर २०२४
- अटकेची कारवाई टाळण्यासाठी 15 हजारांची लाच स्वीकारताना पारोळा पोलीस ठाण्यातील हवालदारास एसीबीने रंगेहाथ पकडले तर दुसरा फरार.
- जळगावात कमरेला गावठी पिस्तूल लावून दहशत माजविणाऱ्या तीन जणांवर पोलीसांची कारवाई.३ गावठी पिस्तूलासह ३ जिवंत काडतुस जप्त.
- दोघांचं एकमेकांवर प्रेम, घरच्यांनी लग्नाला दिली संमती लग्नाच्या एक रात्री आधी वर शिरला वधूच्या खोलीत, आणि………