धक्कादायक! २२ वर्षीय युवतीचा मोबाईलमुळे गेला जीव,पोलीस झालेत हैराण, डॉक्टरांनी उलगडलं रहस्य काय ? आहे प्रकरण वाचा.

Spread the love

जयपूर – मोबाईल फोनमुळे लहान मुलं एडिक्ट होत चाललेत हे सर्वांनीच ऐकलं असेल परंतु युवा वर्गालाही मोबाइलचं असं व्यसन लागलंय ज्यामुळे ते स्वत:वरील नियंत्रणही गमावतात. जयपूरमध्ये घडलेल्या एका घटनेनं सगळीकडे खळबळ माजली आहे.याठिकाणी आईनं मुलीला मोबाईलपासून दूर ठेवलं त्यामुळे तिला राग आला. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवतीचा मोबाईल आईनं लपवला होता. त्यामुळे आई आणि मुलीत झटापट झाली. यात डोक्याला गंभीर मार लागल्याने मुलीचा मृत्यू झाला आहे. राजस्थानच्या रामसर गावातील ही घटना आहे.

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या २२ वर्षीय निकिता सिंह सोमवारी दुपारी तिचा मोबाईल शोधत होती. घरात तिचा मोबाईल सापडत नसल्याने तिने आईकडे विचारणा केली. त्यावेळी आई आणि मुलीमध्ये वाद झाला. वारंवार मोबाईल पाहण्याऐवजी जरा अभ्यासात लक्ष दे असं निकिताच्या आईनं म्हटलं. निकिताची आई सीतानं मुलीचा मोबाईल लपवला होता. हे समजताच मुलगी संतापली. तिच्यात आणि आईमध्ये झटापट झाली. यावेळी मुलीच्या डोक्यात गंभीर जखम झाल्याने ती बेशुद्ध झाली. मुलगी बेशुद्ध झाल्याने आई सीता घाबरली. तिने पती ब्रजेश सिंह यांना कॉल करून घटना सांगितली.

ब्रजेश सिंह घरी पोहचले तेव्हा मुलीला बेशुद्ध पाहून तातडीने १०८ नंबरला कॉल करून रुग्णवाहिका बोलवली. निकिताला हॉस्पिटलमध्ये नेले परंतु तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. निकिताच्या मृत्यूने आई वडिलांना मोठा धक्का बसला आहे. घरातील किरकोळ वादातून मुलीला कायमचं गमवावं लागलं आहे. दरम्यान, निकिताच्या मृत्यूनंतर याप्रकरणी कुटुंबाला कायद्याच्या कचाट्यात अडकायचं नाही त्यामुळे निकिताच्या आई वडिलांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली नाही. परंतु डॉक्टरांच्या माहितीनंतर पोलिसांनी यावर स्वत:हून गुन्हा दाखल केला आहे. कारण हे प्रकरण हत्येचं आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे. मात्र मोबाईलमुळे मुलीचा जीव गेल्यानं परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

नेमकं काय घडलं होतं?

मुलगी मोबाईलचा वापर जास्त करतेय यामुळे वडील ब्रजेश सिंह यांनी निकिताचा मोबाईल स्वीच ऑफ करून पत्नी सीताच्या कपाटात ठेवला. सकाळी वडील ड्युटीला गेले. वडिलांच्या जाण्यानंतर निकितानं आईकडे मोबाईलची विचारणा केली. मात्र आईने मोबाईल देण्यास नकार दिल्यानंतर दोघींमध्ये वाद झाला. या वाद इतका वाढला की, निकितानं रॉडने आईवर हल्ला केला. त्यानंतर रागाच्या भरात आईनेही निकिताच्या हातातील रॉड हिसकावून निकिताच्या डोक्यात मारला. त्यामुळे निकिता गंभीर जखमी झाली. त्यात तिचा मृत्यू झाला.

हे पण वाचा

टीम झुंजार