आजच्या दिवस कसा जाणार याचं कुहल प्रत्येकाला असतं. तो चांगलाच असावा अशी प्रत्येकाची इच्छा असते, पण तसं होतंच असं नाही. त्यामुळंच आपलं भविष्य जाणून घ्यायची उत्सुकता माणसाला असते.
जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजच्या दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष:
आजच्या दिवसाची सुरुवात उर्जेनी आणि निर्धारांनी भरलेली असेल. निर्णय विचारपूर्वक घ्या. नोकरी-व्यवसायासाठी उत्तम दिवस मात्र तुमच्या कौटुंबिक आयुष्यात गोंधळ असेल. जुन्या गोष्टींना उजाळा देणे टाळा. सध्याच्या काळ भविष्याच्या योजना आखण्याचा आहे.
शुभ उपाय- सकाळी उठून पूजा करून गणेशाला दुर्वा वाहा.
शुभ दान- मंदिरात बदाम दान करा.
शुभ अंक- 5
शुभ रंग- लाल
वृषभ:
आज तुमचे दगदगीचे वेळापत्रक व अनियमित जेवणामुळे तुम्ही आनंदी व समाधानी असणार नाही. आर्थिक लाभ संभवतो. उत्पन्न वाढेल. लांबचे प्रवास फलदायी असतील आणि त्यांचे चांगले परिणाम होतील. मात्र आज कष्ट करण्याची आवश्यकता असेल.
शुभ उपाय- पिंपळाच्या झाडावर जल चढवावे.
शुभ दान- गरजूला उडीद, मूग आणि तूर डाळ दान करा.
शुभ अंक- 7
शुभ रंग- लाल
मिथुन:
आज मुलांच्या आरोग्याच्या कुरबुरी राहतील, वैवाहिक आयुष्यात तुम्ही अधिक वेळ देणे आणि बांधिलकी दर्शविणे आवश्यक असेल. कामाबाबत अलिप्तता जाणवेल. मात्र आजचा दिवस कुटुंबासोबत व्यतीत करणे फायद्याचे ठरेल. मानसिक स्वास्थ्य लाभेल.
शुभ उपाय- गायत्री मंत्राचा जप करा.
शुभ दान- गरजूला धातूचे दान करा.
शुभ अंक- 9
शुभ रंग- निळा
कर्क :
तुम्ही आज थोडे आक्रमक असाल, ज्याचा विपरित परिणाम होईल, तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आज यश मिळविण्यासाठी विशेष मेहेनत करावी लागेल. कामात काही अपेक्षाभंग होण्याचीही शक्यता आहे. आर्थिक संचयात वृद्धी संभवते. एखाद्या तीर्थयात्रेची योजना आखाल.
शुभ उपाय- वृद्ध ब्राह्मणांसोबत आपले अन्न वाटून घ्या.
शुभ दान- कोणत्याही गोड पदार्थाचे दान करा.
शुभ अंक- 9
शुभ रंग- पिवळा
सिंह:
आज घरात आणि कामाच्या ठिकाणी वाद आणि भांडणे टाळणे गरजेचे आहे, कारण त्यामुळे तुमच्या संपत्तीचे नुकसान होऊ शकते. स्वतःच्या प्रतिमेला धक्का पोहोचेल असे कोणतेही काम करू नका. आरोग्याची काही तक्रारी उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमच्या आहाराकडे लक्ष द्या. आज काही नवीन गोष्टी शिकला.
शुभ उपाय- वाहत्या नदीमध्ये नाणे सोडा
शुभ दान- इच्छेनुसार पैसे दान करा.
शुभ अंक- 1
शुभ रंग- पांढरा
कन्या:
आज शब्द काळजीपूर्वक वापरावे लागतील, कारण त्या शब्दांमुळे वाद उद्भवून तुम्हाला त्रास होऊ शकतो. तुमच्या कामाचा विस्तार वाढविण्यासाठी तुम्ही घरापासून लांब जाऊ शकता आणि तिथे तुम्ही चांगली आर्थिक प्राप्ती कराल. पण, तुम्ही तुमच्या आप्तेष्टांपासून लांब राहाल. आंबट पदार्थ वर्ज्य करा. आज व्यवसायातून अधिक लाभाची शकयता.
शुभ उपाय- घरातून बाहेर पडताना थोडे काळे तीळ खिशात बाळगा.
शुभ दान- मंदिरात तेलाचे दान करा.
शुभ अंक- 6
शुभ रंग- जांभळा
तूळ:
आज विकास आणि प्रगती करण्यासाठी काही संधी चालून येतील, त्या ओळखून त्यांचा फायदा करून घ्या. तुमच्या आजुबाजूला अधिक उर्जा जाणवेल आणि तुम्हाला इतरांचे नेतृत्व करण्याची इच्छा निर्माण होईल. तुमचे काही आप्तेष्ट तुम्हाला योग्य प्रकारे समजून घेणार नाहीत आणि त्यामुळे तुमच्या नात्यांमध्ये काहीसे वितुष्ट येण्याची शक्यता आहे. आज वैवाहिक आयुष्य टिकवून ठेवण्यासाठी जोडीदारासोबत वाद टाळावेत.
शुभ उपाय- सकाळी सूर्याला अर्घ्य द्या.
शुभ दान- कोणत्याही काचेच्या वस्तूचे दान करा.
शुभ अंक- 2
शुभ रंग- केशरी
वृश्चिक:
आज खर्च प्रमाणापेक्षा अधिक असेल. उत्पन्नही असेल पण तुम्ही तुमच्या खर्चांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. विद्यार्थी चांगली कामगिरी करतील आणि अधिक निर्धारी होतील. आज तुम्हाला धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात स्वारस्य निर्माण होईल, ज्याचा हळू हळू भविष्यात फायदा दिसून येईल. प्रेम प्रकरणात मिश्र स्वरुपाच्या घटना घडतील. एका बाजूला काही गैरसमज होतील तर दुसरीकडे तुमच्या जवळच्या व्यक्तीकडून प्रेमाचा वर्षाव होईल.
शुभ उपाय- एखादी चांदीची वस्तू स्वतःजवळ ठेवा.
शुभ दान- वस्त्रदान करा.
शुभ अंक- 3
शुभ रंग- जांभळा
धनु:
आज तुम्ही तुमच्या कष्टांमुळे प्रगतीपथावर चालाल, मात्र तुम्ही आळशीपणा टाळला पाहिजे. वैवाहिक सुख वाढेल. कुटुंबासाठी काही अनुकूल घटना घडण्याची शक्यता. अनोळखी व्यक्तीवर अजिबात विश्वास ठेऊ नका. मुलांना अभ्यासात किंवा नवीन काही शिकण्यात थोडे अधिक कष्ट घ्यावे लागतील.
शुभ उपाय- सकाळी कुलदेवतेची पूजा करा.
शुभ दान- पक्ष्यांना दाणे द्या.
शुभ अंक- 4
शुभ रंग- हिरवा
मकर:
आज विविध प्रकारच्या संधींच्या माध्यमातून तुम्हाला चांगले आर्थिक परिणाम पाहायला मिळतील. तुमचे सामाजिक वर्तुळ अत्यंत सक्रीय असेल आणि तुमचे समाजातील स्थानही उंचावेल. मुलांमध्ये एकाग्रतेची कमतरता जाणवेल, त्यामुळे मेहेनत ही यशाची गुरकिल्ली असेल. आज काही आरोग्याच्या काही तक्रारी उद्भवू शकतात आणि त्यामुळे थोडा चिडचिडेपणा येऊ शकतो.
शुभ उपाय- कृष्ण वर्णीय गायीची सेवा करावी.
शुभ दान- पांढऱ्या रंगाची वस्तू अथवा वस्त्र दान करा.
शुभ अंक- 3
शुभ रंग- करडा
कुंभ:
आजचा दिवस उत्तम असेल. आज तुम्हाला व्यावसायिक आयुष्यात समाधान लाभण्याची शक्यता. तुमच्या उपक्रमांना यश लाभेल. फार काळापासून असलेली इच्छा पूर्ण होऊ शकते. उत्पन्नाची आवक चांगली राहील. आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या माध्यमातून लाभ संभवतो.
शुभ उपाय- गाईला दुध मिश्रित भात घालावा.
शुभ दान- इच्छेनुसार पैसे दान करा.
शुभ अंक- 8
शुभ रंग- पिवळा
मीन:
आज कामाच्या ठिकाणी चांगले वातावरण राहील आणि तुमच्या कल्पना आकार घेतील. व्यवसायासाठीही काही अनुकूल गोष्टी घडतील. आज आळस टाळावा. तुमचे सहकारी तटस्थ असतील, त्यामुळे तुम्ही स्वत:च्या क्षमतांवर विसंबून असावे. कमी अंतराचे काही प्रवास संभवतात. प्रवासात स्वतःच्या कागदपत्रांची काळजी घ्या.
शुभ उपाय- एखादी चांदीची वस्तू स्वतःजवळ ठेवा.
शुभ दान- कोणत्याही गोड पदार्थाचे दान करा.
शुभ अंक- 5
शुभ रंग- पोपटी
(या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
हे पण वाचा
- आजचे राशी भविष्य गुरूवार दि. २८ नोहेंबर २०२४
- अटकेची कारवाई टाळण्यासाठी 15 हजारांची लाच स्वीकारताना पारोळा पोलीस ठाण्यातील हवालदारास एसीबीने रंगेहाथ पकडले तर दुसरा फरार.
- जळगावात कमरेला गावठी पिस्तूल लावून दहशत माजविणाऱ्या तीन जणांवर पोलीसांची कारवाई.३ गावठी पिस्तूलासह ३ जिवंत काडतुस जप्त.
- दोघांचं एकमेकांवर प्रेम, घरच्यांनी लग्नाला दिली संमती लग्नाच्या एक रात्री आधी वर शिरला वधूच्या खोलीत, आणि………
- आजचे राशी भविष्य बुधवार दि. २७ नोहेंबर २०२४