तुलसी एक्सप्रेसमध्ये कुर्ला ते ठाणे स्थानकाच्या दरम्यानची घटना
ठाणे :- धावत्या ट्रेनमध्ये एका महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईहून निघणाऱ्या तुलसी एक्सप्रेसमध्ये हा प्रकार घडला आहे. ट्रेन कुर्ला आणि ठाणे रेल्वे स्थानकांच्या दरम्यान असताना आपल्याला बेशुद्ध करुन अत्याचार करण्यात आल्याचा आरोपी पीडित महिलेने केला आहे.या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. पीडित महिलेने दावा केला आहे की, लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ट्रेन निघाल्यावर ठाणे रेल्वे स्थानकात पोहोचली आणि याच दरम्यान अज्ञात व्यक्तीने आपल्याला बेशुद्ध केले.
बेशुद्ध केल्यावर बलात्कार करण्यात आल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीनंतर ठाणे जीआरपीने गुरुवारी गुन्हा दाखल केला आहे.वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांनी सांगितले की, ठाणे जीआरपीने गुरुवारी या प्रकरणी कलम 328 आणि 376 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आमचा तपास सुरू आहे. ही घटना मार्च महिन्यात घडली आहे. पीडित महिलेने आरोप केला आहे की, ती 10 मार्च रोजी उत्तरप्रदेशात जाण्यासाठी निघाली होती आणि त्यासाठी तुलसी एक्सप्रेसमध्ये बसली.
त्याच दरम्यान अज्ञात व्यक्तीने तिला बेशुद्ध करण्यासाठी काही पदार्थ खायला दिला. त्यानंतर ती बेशुद्ध झाली आणि मग तिच्यावर अत्याचार करण्यात आला. ट्रेनमध्ये बसल्यानंतर जवळपास 40 मिनिटांनी तिच्यावर अत्याचार करण्यात आला असल्याचंही पीडित महिलेने म्हटलं आहे.पीडित महिलेने दावा केला आहे की, ही घटना कुर्ला ते ठाणे रेल्वे स्थानकांच्या दरम्यान झाली आहे. तुलसी एक्सप्रेस लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटली आणि त्यानंतर हा प्रकार घडला. पोलिसांनी सांगितले की, पीडित महिलेने घटनेच्या 39 दिवसांनी एप्रिल महिन्यात मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर जीआरपीसोबत संपर्क केला आणि घडलेला प्रकार सांगितला.
त्यानंतर जवळपास 21 दिवसांनी हे प्रकरण ठाणे जीआरपीकडे ट्रान्सफर करण्यात आलं.वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांनी सांगितले की, ही घटना मार्च महिन्यात घडली होती आणि त्या दिवसाचं लोकमान्य टिळक टर्मिनस येथील सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नाहीये. पोलिसांनी तुलसी एक्सप्रेस आणि त्याच वेळात लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रवाना होणाऱ्या दोन रेल्वेतील तिकीट आरक्षणाची यादी तपासली आहे. या प्रकरणी मोबाईल फोन रेकॉर्ड आणि इतर तांत्रिक माहिती गोळा करण्यात येत आहे.
हे पण वाचा
- आजचे राशी भविष्य गुरूवार दि. २८ नोहेंबर २०२४
- अटकेची कारवाई टाळण्यासाठी 15 हजारांची लाच स्वीकारताना पारोळा पोलीस ठाण्यातील हवालदारास एसीबीने रंगेहाथ पकडले तर दुसरा फरार.
- जळगावात कमरेला गावठी पिस्तूल लावून दहशत माजविणाऱ्या तीन जणांवर पोलीसांची कारवाई.३ गावठी पिस्तूलासह ३ जिवंत काडतुस जप्त.
- दोघांचं एकमेकांवर प्रेम, घरच्यांनी लग्नाला दिली संमती लग्नाच्या एक रात्री आधी वर शिरला वधूच्या खोलीत, आणि………
- आजचे राशी भविष्य बुधवार दि. २७ नोहेंबर २०२४