जळगाव जिल्हाच्या आकाशात दिसला उल्कापाताचा अनोखा नजारा, नागरिकांमध्ये खळबळ

Spread the love

जळगाव : जळगाव जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागात आज सायंकाळी ७.३० ते ८ वाजेच्या सुमारास उल्कापाताचा अनोखा नजारा पाहायला मिळाला आहे. उल्कापात दिसल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान अनेकांनी उल्कापात होताना आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात उल्कापात कैद केला असून सोशल मीडियावर सध्या हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

मात्र नेमके या उल्का कुठे पडल्या या अद्याप समजू शकले नाही. जळगाव शहरासह मुक्ताईनगर चोपडा या भागात अनेकांनी उल्कापात पाहिल्याचा दावा केला आहे. लोकांना सध्या नेमंक होतंय हे काय कळेनाय. याबाबत प्रशासनाचीही अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आली नाही. दरम्यान, आकाशात दिसलेले ते दृश्य म्हणजे न्यूझीलंडच्या माहीया द्वीपकल्पावरुन इलेक्ट्रॉन राॅकेटद्वारे प्रक्षेपित करण्यात आलेल्या ब्लॅकस्काय नावाच्या उपग्रहाच्या बूस्टरचे तुकडे असल्याची माहिती औरंगाबाद येथील एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी दिली आहे.

टीम झुंजार