एरंडोल :- राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल कृष्णा समोर असलेल्या महाजन नगरातील दगडांपासून मूर्ती बनवणा-या कारागिराच्या घरात ७ मे रोजी पहाटेच्या सुमारास खिडकीची लोखंडी जाळी वाकवून चोरी करणा-या संशयितास पोलीस उपनिरीक्षक शरद बागल यांच्यासह त्यांच्या सहका-यांनी केवळ अठरा दिवसात मध्यप्रदेशातील गुडा शहापूर येथील संशयितास शिरपूर येथून अटक केली.संशयिताकडून चोरीतील एक मोबाईल जप्त केला असून त्याचे दोन साथीदार
फरार झाले आहेत.संशयितास न्यायालयासमोर उभे केले असता त्यास तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायाधीशांनी दिला.
दरम्यान संशयिताकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.संशयिताचे फरार असलेल्या दोन्ही साथीदारांना देखील लवकरच अटक केली जाईल असा विश्वास उपनिरीक्षक शरद बागल यांनी व्यक्त केला. याबाबत माहिती अशी,की राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल कृष्णा समोर असलेल्या महाजन नगर येथे मेहेरबाननाथ सिंधुनाथ सोलंकी हे पत्नी व मुलांसह भाड्याच्या घरात राहतात.मेहेरनाथ सोलंकी हे राजस्थानमधून दगड आणून त्याच्यापासून मुर्त्या घडविण्याचे काम करतात.७ मे रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी सोलंकी यांच्या घराच्या भिंतीची लोखंडी जाळून वाकवून १ लाख ९८ हजार रुपये रोख,१५ हजार रुपये किमतीचे चांदीचे कडे आणि ५० हजार रुपये किमतीचे मोबाईल असा एकूण २ लाख ६३ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला होता.
चोरी झाल्यानंतर पोलीस निरीक्षक सतीश गोराडे, उपनिरीक्षक शरद बागल यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली होती.सदर गुंयाचा तपास पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांनी उपनिरीक्षक शरद बागल यांचेकडे दिला होता. गुन्ह्याबाबत कोणताही पुरावा उपलब्ध नसल्यामुळे चोरट्यांना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे होते.पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी,चाळीसगावच्या अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर,अमळनेर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील नंदनवाळ,पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांचे मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शरद बागल व त्यांचे सहकारी हवलदार अकिल मुजावर,आकाश शिंपी,पंकज पाटील यांनी चोरट्यांचा शोध सुरु केला.
उपनिरीक्षक शरद बागल यांनी घरफोडी झालेल्या मेहेरबाननाथ सोलंकी यांच्या चोरी झालेल्या मोबाईल क्रमांकाचा आयएमईआय सी.डी.आर.व घटनास्थळाचा सेल आयडी डमडाटा काढून त्याच्या माध्यमातून तपास केला असता आरोपीचा एक मोबाईल सुरु असल्याची माहिती मिळवली.तांत्रिक माहितीच्या आधारावर उपनिरीक्षक बागल व त्यांचे सहकारी अकिल मुजावर, आकाश शिंपी,पंकज पाटील यांनी यांनी कुंवरसिंग गंगाराम खराते यास शनिवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास ताब्यात घेतले.संशयिताकडून करीस गेलेल्या तीन मोबाईलपैकी एक मोबाईल जप्त केला असून त्याचे सुनील बारेला व काळू बारेला हे दोन साथीदार फरार झाले आहेत.
घरफोडीप्रकरणी कोणताही पुरावा उपलब्ध नसतांना तांत्रिक बाबींच्या माध्यमातून संशयितास पोलिसांनी अटक केल्याबद्दल नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात असून संशयिताकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.दरम्यान उपनिरीक्षक शरद बागल यांनी यापूर्वी देखील कोणताही पुरावा नसतांना अल्पवयीन मुकीस फूस लावून पळवून नेलेल्या संशयितास राजस्थान येथून अटक केली होती.जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी उपनिरीक्षक शरद बागल व त्यांच्या सहका-यांचा प्रमाणपत्र प्रदान करून
सत्कार केला होता.
हे पण वाचा
- आजचे राशी भविष्य गुरूवार दि. २८ नोहेंबर २०२४
- अटकेची कारवाई टाळण्यासाठी 15 हजारांची लाच स्वीकारताना पारोळा पोलीस ठाण्यातील हवालदारास एसीबीने रंगेहाथ पकडले तर दुसरा फरार.
- जळगावात कमरेला गावठी पिस्तूल लावून दहशत माजविणाऱ्या तीन जणांवर पोलीसांची कारवाई.३ गावठी पिस्तूलासह ३ जिवंत काडतुस जप्त.
- दोघांचं एकमेकांवर प्रेम, घरच्यांनी लग्नाला दिली संमती लग्नाच्या एक रात्री आधी वर शिरला वधूच्या खोलीत, आणि………
- आजचे राशी भविष्य बुधवार दि. २७ नोहेंबर २०२४