पतीच्या निधनानंतर गेली मुंबईला तेथे भीक मागून गावाकडे घेतली तीन एकर जमीन,उत्पन्न झाले सुरू,मुलीचे थाटात केले लग्न, पण शेवटी………

Spread the love

मुंबई :- मायानगरी. अनेक जण आपले नशिब अजमवण्याासाठी मुंबईत येतात. गेल्या 38 वर्षांपूर्वी कराडमधून शांताबाई मुंबईत आली होती. काहीच कामधंदा नसल्यामुळे तिने भीक मागण्याचे काम सुरु केले.या भीक मागण्याच्या उद्योग सुरु केला. यामधून त्यांना महिन्याला 25 ते 35 हजार रुपये मिळत होते. त्यातील 25 हजार रुपये त्या कराडला राहणाऱ्या मुलीकडे पाठवत होत्या. त्यानंतर उरलेले पैसे स्वत:साठी खर्च करत होत्या.

शांताबाईच्या मुलीने आणि नातवाने या पैशांमधून सुमारे 3 एकर जमीन खरेदी केली. त्यावर शेती सुरु केली. आज त्यांच्या शेतात कापूस, सोयाबीन आहे. तसेच उर्वरित जमिनीवर घरे बांधून त्यातून दरमहा लाखो रुपये भाडे मिळत आहेत. त्या शांताबाईंचे मुंबईत शुक्रवारी संशयास्पद निधन झाले. त्यांच्या मृत्यूची पोलीस चौकशी करत आहेत.

मुंबईत आल्या आणि भीक मागणे सुरु केले

शांताबाई यांचे पती गावात शेती करत होते. पतीच्या निधनानंतर दोन वर्षांनी त्यांच्याकडे कोणताही व्यवसाय उरला नाही. त्यामुळे 38 वर्षांपूर्वी त्या मुंबईत आल्या. त्यांनी मुंबईत येऊन भीक मागण्याचे काम सुरु केले. म्हणजेच गेल्या जवळपास 35-36 वर्षांपासून त्या मुंबईत भीक मागत होत्या. भीक मागूनच त्याने आपल्या एकुलत्या एक मुलीचे लग्न मोठ्या थाटामाटात केले होते.चिंचोली बंदरमध्ये भाड्याच्या घरात वास्तव्यविशेष म्हणजे, शांताबाई स्वत: शेवटच्या दिवसांपर्यंत मालाडच्या विठ्ठल नगर, चिंचोली बंदर येथे भाड्याच्या घरात राहत होत्या.

या घरासाठी त्या दरमहा चार हजार रुपये घरमालकाला देत होत्या. याच घरात गेल्या आठवड्यात शुक्रवारी शांताबाई यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत सापडला. त्यानंतर मलाड पोलिसांनी हत्या आणि चोरीचा खटला दाखल केला आहे. या प्रकरणात तपास करुन 45 वर्षीय बैजू महादेव मुखिया याला अटक केली आहे.बैजू शांताबाईच्या पूर्वी त्या घरात राहत होता. त्याची चौकशी पोलीस करत आहेत. या प्रकरणात बैजू याला सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अटक केली आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार