नवी दिल्ली : नवी दिल्लीच्या इंडिया गेटजवळ एका व्यक्तीची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. प्रेमप्रकरणातून हत्या झाल्याची माहिती पुढे आली असून, पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. प्रभाकर (वय २५, रा.संगम विहार, मुळ रा. इटावा, उत्तर प्रदेश)असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.नवी दिल्लीतील इंडिया गेटच्या जवळ रात्रीच्या सुमारास एका आईस्क्रिम विक्रेत्याची हत्या करण्यात आली. कर्तव्यपथ पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांना इंडिया गेटजवळ काही मारामारी सुरू असल्याची माहिती मिळाली.
त्यानंतर पोलीस घटनास्थळी गेले. तिथे प्रभाकर जखमी अवस्थेत पोलिसांना आढळला. पोलिसांनी त्याला तत्काळ लेडी हार्डिंग रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. प्रभाकरचा मोबाईल तिथे सापडला नाही. त्याच्या कुटुंबियांची चौकशी केल्यावर त्याचे एका अल्पवयीन मुलीशी संबंध असल्याचे पोलिसांना समजले.पोलिसांनी या घटनेचा तपास करण्यासाठी पथक तयार केले. ती अल्पवयीन मुलगी व तिच्या नातेवाईकांच्या कॉलवर लक्ष ठेवले. दिल्लीतल्या विविध भागांत छापेमारीही केली.
आरोपी हत्या करून कुठे व कसा पळून गेला हे शोधण्यासाठी त्या भागातलं सीसीटीव्ही फूटेज तपासण्यात आले. चौकशीत असे आढळले की त्या अल्पवयीन मुलीचे प्रभाकर व अजय उर्फ आकाश नावाच्या आणखी एका व्यक्तीशी संबंध होते. अजय उत्तर प्रदेशातील गोंडा इथला रहिवासी आहे.प्रभाकरशी संबंध तोडण्यासाठी तिने अजयच्या मदतीने कट रचला होता. पोलिसांनी अजयला पकडले असून, त्याच्याकडून प्रभाकरचा मोबाईल जप्त करण्यात आला.
अजय नोएडातल्या शाहपुरा येथे मलिक टेंट हाउसवर कामगार आणि ड्रायव्हर म्हणून काम करत होता. मोबाईल कॉल, सीसीटीव्ही फुटेज, छापेमारी व घटनेतील संबंधित व्यक्तींची चौकशी करून पोलिसांनी या घटनेचा छडा लावला. आरोपी अजय व अल्पवयीन मुलीचा कट त्यामुळे उघडकीस आला. आरोपी अजयला पोलिसांनी अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.
हे पण वाचा
- आजचे राशी भविष्य गुरूवार दि. २८ नोहेंबर २०२४
- अटकेची कारवाई टाळण्यासाठी 15 हजारांची लाच स्वीकारताना पारोळा पोलीस ठाण्यातील हवालदारास एसीबीने रंगेहाथ पकडले तर दुसरा फरार.
- जळगावात कमरेला गावठी पिस्तूल लावून दहशत माजविणाऱ्या तीन जणांवर पोलीसांची कारवाई.३ गावठी पिस्तूलासह ३ जिवंत काडतुस जप्त.
- दोघांचं एकमेकांवर प्रेम, घरच्यांनी लग्नाला दिली संमती लग्नाच्या एक रात्री आधी वर शिरला वधूच्या खोलीत, आणि………
- आजचे राशी भविष्य बुधवार दि. २७ नोहेंबर २०२४