जळगाव : नेपाळी नोकराने आपल्या साथीदारांच्या मदतीने मालकाच्या घरातील ऐवज लुटून नेल्याची घटना जळगाव शहरात घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस संशयितांचा शोध घेत आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील शिवाजीनगर भागात राहणाऱ्या राजा मयुर यांच्याकडे विकास नावाचा नेपाळी नोकर काम करत होता. त्याने राजा मयुर यांच्या सोबत त्यांच्या घराला पहारा देणाऱ्या नोकरांना गुंगीचे औषध असलेले सरबत पाजून बेशुद्ध केले.
तर मालकीण या सरबत पित नसल्याने त्यांना चाकूचा धाक दाखवत त्यांना खोलीत कोंडून ठेवले.सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोकड लंपासत्यानंतर घरातील सोन्या चांदीच्या दागिन्यांसह काही रोकड घेऊन विकास हा पसार झाला आहे. या घटनेत राजा मयूर आणि त्यांचे सुरक्षा रक्षक हे तिघेही बेशुद्ध असल्याचं लक्षात आल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला.तिघांवर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस या घटनेतील विकास नेपाळी आणि त्याच्या साथीदारांना शोध घेत आहेत.
हे पण वाचा
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






