Viral Video : काही लोकांना वाईट सवयी असतात. या वाईट सवयी अनेकदा त्यांना अडचणीत टाकतात. अनेक लोकांना चोरी करण्याची वाईट सवय असते. हे लोक कुठेही गेले तरी चोरी करण्याचा विचार करतात. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेकदा या लोकांच्या चोरी सीसीटिव्ही कॅमेरामध्ये सुद्धा कैद होतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका तरुणीला मॉलमध्ये चोरी करताना पकडले. त्यानंतर पुढे जे काही होते ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल.
सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल एका मेगामार्टमधून एक तरुणी काही सामान चोरी करताना सापडली. त्यानंतर तेथील महिला कर्मचाऱ्यांनी तिला पकडले पण ही तरुणी उलट कर्मचाऱ्यांवर भडकली. व्हिडीओमध्ये तरुणी एका महिला कर्मचारी बरोबर वाद घालताना दिसते.तेव्हा मेगामार्टमधील कर्मचारी एकत्र गोळा होतात आणि तिला मारताना दिसतात. तेव्हा तरुणी पळताना दिसते पण मार्टमधील कर्मचारी तिला पकडतात आणि बाहेर घेऊन जातात. व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.
व्हिडीओ पाहून तुम्हालाही वाटेल, ‘चोर तर चोर आणि वर शिरजोर’ सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ वाराणसी येथील विशाल मेगामार्टमधील आहे.gharkekalesh या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, ‘महिला कर्मचारी आणि तरुणीमध्ये वाद. तरुणी चोरी करताना सापडली, विशाल मेगामार्ट वाराणसी’ या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एका युजरने लिहिलेय, ‘या जागी मुलगा चोरी करताना पकडला असता तर लोकांना मारून मारून त्याला कबुतर बनवले असते’ तर एका युजरने लिहिलेय, ‘चोर तर चोर आणि वर शिरजोर.. वाह कलियुग आहे’ आणखी एका युजरने लिहिलेय, ‘वो स्त्री है वो कुछ भी कर सकती है’ काही लोकांनी या तरुणीवर संताप व्यक्त केला आहे तर काही युजर्सनी मार्टमधील महिला कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहेत.
हे पण वाचा
- अटकेची कारवाई टाळण्यासाठी 15 हजारांची लाच स्वीकारताना पारोळा पोलीस ठाण्यातील हवालदारास एसीबीने रंगेहाथ पकडले तर दुसरा फरार.
- जळगावात कमरेला गावठी पिस्तूल लावून दहशत माजविणाऱ्या तीन जणांवर पोलीसांची कारवाई.३ गावठी पिस्तूलासह ३ जिवंत काडतुस जप्त.
- दोघांचं एकमेकांवर प्रेम, घरच्यांनी लग्नाला दिली संमती लग्नाच्या एक रात्री आधी वर शिरला वधूच्या खोलीत, आणि………
- आजचे राशी भविष्य बुधवार दि. २७ नोहेंबर २०२४
- भरधाव वेगाने जाणा-या कारने रस्ता ओलांडत असलेल्या व्यक्तीस जोरदार धडक; उपचारादरम्यान मृत्यू.