यावल :- तालुक्यातील आडगाव या गावात मागील भांडणाच्या कारणावरून दोन कुटुंबांमध्ये हाणामारी झाली. ही घटना दिनांक ३० मे रोजी सकाळी पावणेदहा वाजता घडली होती.यात मिरची पावडरचा वापर करण्यात आला. तेव्हा यावल पोलीस ठाण्यात एका गटाकडून १० तर दुसऱ्या गटाकडून पाच जणांना विरूध्द अशा दोन्ही गटाकडून १५ जणाविरुद्ध दंगलीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आडगाव ता. यावल या गावातील सुलोचनाबाई मच्छिंद्र पाटील वय ४३ यांनी यावल पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार
मागील भांडणाच्या कारणावरून संतोष उर्फ भाऊसाहेब प्रकाश पाटील, विजय प्रकाश पाटील, रमेश भास्कर पाटील, रवींद्र समाधान पाटील, कल्पना रमेश पाटील, सुशीला प्रकाश पाटील, भटू रामचंद्र पाटील, रूपाली भटू पाटील, माधुरी निलेश पाटील व अनिता भाऊसाहेब पाटील या दहा जणांनी त्यांना शिवीगाळ करून फिर्यादी महिला व तिचे पती, मुलगा यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून मारहाण केली आणि त्यांच्या गळ्यातील पोत तोडून नुकसान केले आणि त्यांना ठार मारण्याची धमकी दिली म्हणून सुलोचनाबाई पाटील यांच्या फिर्यादीवरून १० जणाविरुद्ध यावल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास यावल पोलिसांचे पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार उमेश महाजन करीत आहे.दुसऱ्या गटाकडून पाच जणां विरूध्द गुन्हा.आडगाव गावातील भाऊसाहेब प्रकाश पाटील वय ३६ वर्ष यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मागील भांडणाच्या कारणावरून मच्छिंद्र भागवत पाटील, मनोज मच्छिंद्र पाटील, सुलोचनाबाई मच्छिंद्र पाटील, रोशनी मच्छिंद्र पाटील व मोनिका मच्छिंद्र पाटील या पाच जणांनी त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली लाकडी दांड्याने त्यांना मारून दुखापत केली म्हणून भाऊसाहेब पाटील यांच्या फिर्यादीवरून पाच जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- एरंडोल विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अमोलदादा पाटील यांचा एकतर्फी विजय,५६ हजार ३३२ मतांनी दणदणीत विजय.
- Viral Video:एका कारचालकास रुग्णवाहिकेला रस्ता न देणे पडले महागात, पोलिसांनी शिकवला धडा, लायसन्स केलं रद्द अन् केला लाखो रुपये दंड.
- आक्षेपार्ह पोस्टमुळे धरणगावात तणावपूर्ण बंद; भाजप व शिवेसेनेतर्फे पोलीस निरीक्षकांना निवेदन
- पतीच्या उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूनंतर तीन तासांत पत्नीने संपवली जीवन यात्रा; दोघांचे एकाच चितेवर अंत्यसंस्कार
- सोशल मिडीयावर माळी समाजावरील आक्षेपार्ह मजकुराच्या निषेधार्थ एरंडोल बंद; माजी पालकमंत्री डॉ.सतीश पाटील यांच्या पुतळ्याचे दहन.