हळदीच्या कार्यक्रमात नाचताना धक्का लागल्यानं दोन गटात लाठी,काठ्या तलवारीनं तुबंळ हाणामारीत एकाचा मृत्यू, 7 संशयितांना घेतलं ताब्यात.

Spread the love

जालना:- येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. जालन्यात दोन गटात लाठी, काठ्या आणि तलवारीनं तुबंळ हाणामरी झाली. या घटनेत तलवारीचे वार झाल्यानं एकाचा जागीच मृत्यू झाला आहे.व्यंकटेश तुकाराम गायकवाड असं मृत व्यक्तीचं नाव आहे. शहरातील शास्त्री मोहल्ला परिसरात ही घटना घडली आहे. या प्रकरणात पोलिसांनी सात संशयितांना ताब्यात घेतलं असून, घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, जालन्यात दोन गटात लाठ्या काठ्या आणि तलवारीनं मारहाण झाल्याची घटना घडली आहे. यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. व्यंकटेश तुकाराम गायकवाड असं मृत व्यक्तीचं नाव आहे. तो कैकाडी मोहल्ल्यातील रहिवासी आहे. एका हळदीच्या कार्यक्रमात नाचताना धक्का लागल्यानं ही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी तातडीनं धाव घेतली. या घटनेतील जखमीला पोलिसांनी उपचारासाठी तातडीनं जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल केलं.

या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत सात संशयितांना ताब्यात घेतलं आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.दरम्यान या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. तुफान हाणामारीची घटना घडली असून, यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. त्यामुळे परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार