चंदीगड :- अभिनेत्री आणि भाजपची नवी खासदार कंगना रणौतबरोबर चंदीगड विमानतळावर धक्कादायक घटना घडली. चंदीगड विमानतळावर CISFच्या महिला रक्षकानं कंगना रणौतच्या कानाखाली मारली. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे.कंगना रणौतनं नुकतीच हिमाचल प्रदेशच्या मंडी येथून लोकसभा निवडणूक जिंकली. कंगना मंडीची खासदार झाली. त्यानंतर विमानतळावर कंगनाबरोबर घटनेनं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. चंदीगड विमानतळावर कंगनाबरोबर घडलेल्या घटनेचा पहिला व्हिडीओ समोर आला आहे.मंडीतील निवडणूक जिंकल्यानंतर कंगना दिल्लीला निघाली होती.
दरम्यान चंदीगड विमानताळावर चेकींग सुरू असताना CISFच्या महिला अधिकाऱ्यानं कंगनाच्या कानाखाली मारली. मारणाऱ्या महिला अधिकाऱ्याविरोधात कारवाई करण्याची मागणी कंगनानं केली आहे. काही वेळाताच पुढील तपासासाठी CISFच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असलेली चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे.आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर CISFच्या वरिष्ठ कमांडंटच्या खोलीत बसून या प्रकरणार वाद झाला आहे. महिला अधिकाऱ्याची इथे चौकशी सुरू आहे.
भाजपकडून कंगनाला उमेदवारी देण्यात आली होती. हिमाचल प्रदेशच्या मंडी येथून कंगनानं निवडणूक लढवली. विजय मिळवल्याचा आनंद कंगना साजरा करत होती. तिनं सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदारांचे आभार देखील मानले होते. माझं यश हे पंतप्रधान मोदींचं आहे असंही तिनं सांगितलं.दरम्यान “मंडीची खासदार, दिल्ली कॉलिंग, पार्लमेंटच्या दिशेनं” असं म्हणत कंगना दिल्ली पार्लमेंटच्या दिशेनं निघाली होती. चंदीगड विमानतळावर कंगनाबरोबर हा धक्कादायक प्रकार घडला.
सीआयएसएफकडून सीसीटीव्हीद्वारे तपास
चंदीगड विमानतळावर सीआयएसएफकडून सीसीटीव्ही तपासले जात आहेत. बॉलीवूडची धडाकेबाज क्वीन कंगना राणौत आता राजकारणाचीही राणी बनली आहे. लोकसभा 2024 च्या निवडणुकीत मंडी लोकसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार कंगना रणौत विजयी झाल्या आहेत. कंगनाने काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह आणि विद्यमान खासदार पुत्र विक्रमादित्य सिंह यांचा पराभव करून विजयाचा झेंडा फडकावला आहे.
भाजपच्या वतीने निवडणुकीत उभी राहिलेली कंगना रणौत हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघातून जिंकली आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत चित्रपट जगतातील अनेक उमेदवार विजयी झाले आहेत. दरम्यान, दक्षिणेतील अभिनेते सुरेश गोपी यांनी त्रिशूर मतदारसंघ जिंकून केरळचे पहिले भाजप लोकसभा खासदार म्हणून इतिहास रचला. मंडीतून विजय प्राप्त करीत कंगनाने तिच्या विरोधकांचे तोंड बंद केले आहे.
हे पण वाचा
- जळगावात कमरेला गावठी पिस्तूल लावून दहशत माजविणाऱ्या तीन जणांवर पोलीसांची कारवाई.३ गावठी पिस्तूलासह ३ जिवंत काडतुस जप्त.
- दोघांचं एकमेकांवर प्रेम, घरच्यांनी लग्नाला दिली संमती लग्नाच्या एक रात्री आधी वर शिरला वधूच्या खोलीत, आणि………
- आजचे राशी भविष्य बुधवार दि. २७ नोहेंबर २०२४
- भरधाव वेगाने जाणा-या कारने रस्ता ओलांडत असलेल्या व्यक्तीस जोरदार धडक; उपचारादरम्यान मृत्यू.
- दोन गायी तीन गोवंश यांची निर्दयीपणे अवैध वाहतूक करणारे दोन वाहने जप्त. चौघांवर गुन्हा दाखल.