लखनऊ : हत्येचं एक हादरवणारं प्रकरण समोर आलं आहे. यात एका महिलेनं एका तांत्रिकाच्या सांगण्यावरून दुष्ट आत्म्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी महिन्याभरात आपल्या दोन पुतण्यांचा बळी दिला. तिने दोन्ही पुतण्यांची हत्या केली.या प्रकरणी पोलिसांनी मारेकरी काकू आणि तिच्या आईला अटक केली आहे. मात्र, तांत्रिक अद्याप पोलिसांच्या आवाक्याबाहेर आहे. ही घटना उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगरमधून समोर आली आहे.17 मे रोजी खतौली परिसरातील कैलावडा गावात सात वर्षांच्या चिमुकल्याचा मृतदेह घरात आढळून आला होता.
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमार्टमसाठी पाठवला. तर पोलिसांनी मृतदेहाजवळून काही तांत्रिक विधी आणि एक चिठ्ठीही जप्त केली. ज्यावर लिहिलं होतं – आता आत्म्याला शांती मिळाली. आत्म्याला शांती मिळो यापूर्वी 24 एप्रिल रोजी मृताच्या पाच वर्षांच्या भावाचा मृतदेहही घरातून संशयास्पद स्थितीत सापडला होता. त्यावेळी आजारी पडल्याने बालकाचा मृत्यू झाला असेल, या विचाराने कुटुंबीयांनी मृत बालकाचे अंत्यसंस्कार केले होते. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता, मुलांची काकू अंकिता आणि तिची आई रीना यांनी तांत्रिकाच्या सांगण्यावरून मुलांची हत्या केल्याचे समोर आले.
पोलिसांनी अंकिता आणि रीनाला अटक केली असून तांत्रिकाचा शोध घेण्यात पोलीस व्यस्त आहेत.अंकिताने पोलिसांना सांगितलं की, तिला काही दुष्ट आत्म्याने ग्रासलं होतं, त्यामुळे तिची तब्येत अनेकदा खराब राहायची. म्हणून तिने तिची आई रीना हिच्यासह जात तांत्रिक राम गोपालकडे उपचार करून घेतले. तांत्रिक रामगोपालच्या सांगण्यावरून अंकिताने 24 एप्रिल रोजी ओढणीने गळा आवळून तिच्या 5 वर्षीय पुतण्याचा बळी दिला होता. मात्र काहीही फायदा न झाल्याने तिने तांत्रिकाच्या सल्ल्यानुसार 17 मे रोजी पुन्हा आपला दुसरा पुतण्या केशवचा बळी दिला.
हे पण वाचा
- जळगावात कमरेला गावठी पिस्तूल लावून दहशत माजविणाऱ्या तीन जणांवर पोलीसांची कारवाई.३ गावठी पिस्तूलासह ३ जिवंत काडतुस जप्त.
- दोघांचं एकमेकांवर प्रेम, घरच्यांनी लग्नाला दिली संमती लग्नाच्या एक रात्री आधी वर शिरला वधूच्या खोलीत, आणि………
- आजचे राशी भविष्य बुधवार दि. २७ नोहेंबर २०२४
- भरधाव वेगाने जाणा-या कारने रस्ता ओलांडत असलेल्या व्यक्तीस जोरदार धडक; उपचारादरम्यान मृत्यू.
- दोन गायी तीन गोवंश यांची निर्दयीपणे अवैध वाहतूक करणारे दोन वाहने जप्त. चौघांवर गुन्हा दाखल.