फेसबुकवरिल मैत्रीचे प्रेमात रूपांतर,लग्नाचं वचन, शारीरिक संबंध संमतीनं ठरल लग्न,नवरी वरातीची वाट पाहत होती नवरदेवाला फोन केला अन् लग्नच मोडलं

Spread the love

भोपाळ : असे बरेच कपल आहेत ज्यांची ओळख सोशल मीडियावर होते, त्यांच्यात आधी मैत्री मग प्रेम होतं आणि मग ते लग्नही करतात. असंच सोशल मीडियावर ओळख झालेलं कपल. जे एकमेकांना फेसबुकवर भेटले.त्यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. त्यांचं लग्नही ठरलं. लग्नाच्या दिवशी नवरी वरातीची प्रतीक्षा करत होती. वरात कुठे पोहोचली हे विचारण्यासाठी उत्साहात तिनं नवरदेवाला फोन केला आणि लग्नच मोडलं.

मध्य प्रदेशच्या हबेली गावातील ही धक्कादायक घटना आहे. अर्जुन डोहरे असं या नवरदेवाचं नाव आहे. त्याने तरुणीला आपण राजस्थानच्या जयपूरमध्ये राहत असल्याचं सांगितलं होतं. तसंच आपले वडील माजी आमदार असल्याचंही त्यानं सांगितलं. तरुण-तरुणी दोघं एकमेकांना प्रत्यक्षात भेटले, अर्जुननं लग्नाचं वचन दिलं आणि तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले.

कुटुंबाच्या संमतीनं लग्न

मुलीच्या कुटुंबाने तिच्या पसंतीला संमती दिली. दोघांचं लग्न ठरलं. लग्नाची तारीख ठरली 20 मे, भांडेर येथील हरिओम मॅरेज गार्डनमध्ये लग्नाची तयारी सुरू होती. तीन दिवसांपासून मुलीच्या कुटुंबाच्या घरी विधी सुरू होते. यादरम्यान अर्जुन आणि तरुणीचं फोनवर मध्ये मध्ये बोलणं सुरूच होतं.

नवरी वरातीची वाट पाहत राहिली, नवरदेवाचा फोन बंद

तरुणी वरातीची वाट पाहत होती. ती कुठे पोहोचली म्हणून विचारायला तिनं अर्जुनला फोन लावला. अर्जुननं फोन उचलला. आपण वाटेतच आहोत, रात्री 12 पर्यंत पोहोचतो असं सांगून त्याने फोन ठेवला. तपण वरात काही आली नाही. त्यानंतर अर्जुनचा फोनही बंद होता. पीडितेने भांडेर पोलीस ठाण्यात अर्जुनविरोधात तक्रार दाखल केली आहे. आता भांडेर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

पीडितेच्या भावाने सांगितलं की, ‘बहिणीचं लग्न ठरलं होतं. त्यामुळे आम्ही लग्नाची मिरवणूक येण्याची तयारी करत होतो. संध्याकाळी सात वाजता मी वराशी लग्नाच्या मिरवणूक निघताना बोललो होतो, त्याने आम्ही निघालो आहोत, असं सांगितलं. नंतर त्याचा फोन लागला नाही, स्विच ऑफ होता. रात्री 3 वाजेपर्यंत थांबलो. त्यानंतर आम्ही तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशन गाठलं.

हे पण वाचा

टीम झुंजार