.
मुंबई प्रतीनिधि : जिल्ह्यातील पवनपारमध्ये आवकाशातून पडलेल्या वस्तूचा एक भाग सापडला. सिंदेवाही येथील लाडबोरी गावात शनिवारी रात्री आकाशातून रिंग आणि गोळा पडल्याने एकच परिसरात खळबळ उडाली. अवशेष बंद पडलेल्या सॅटेलाईटचे असल्याची माहिती प्राथमिक माहिती समोर आली आहे.
आज रविवारी सकाळी सिंदेवाही तालुक्यातील पवनपार गुंजेवाहीजवळ गोल आकाराचा अवशेष नागरिकांना मिळाला आहे. हा अवशेष हायड्रोजन टँकसारखा दिसत असून त्याचा उपयोग सॅटेलाईटमध्ये उपकरण सिस्टीम सारखा उपयोग केला जातो. सध्या अभ्यासक यावर संशोधन करीत असून याबाबत लवकरच अचूक माहिती पुढे येईल असे सांगण्यात येत आहे. दरम्यान सिंदेवाही परिसरातील या दोन्ही गावांना अभ्यासक सकाळपासून भेटी देत आहेत.
लोखंडी रिंग इलेक्ट्रॉन रॉकेट बुस्टरचेच तुकडे असल्याचे सांगण्यात येत आहे. न्यूझीलंड येथील माहीया द्वीपकल्पावरुन भारतीय वेळेनुसार सायंकाळी 6.11 वाजता तेथील रॉकेट लॅब कंपनीच्या इलेक्ट्रॉन रॉकेटद्वारे ब्लॅकस्काय नावाचा उपग्रह पृथ्वीच्या 430 किमी उंचीवर नेऊन स्थिरावण्यात आला. केवळ एकाच रॉकेट उड्डाणाची नोंद असल्याने सायंकाळी उत्तर – पूर्व महाराष्ट्रात दिसलेली घटना ही या इलेक्ट्रॉन रॉकेटच्या बुस्टरचेच असावेत.
अकोल्यातही काल सायंकाळी अंधार पडला. आकाश अगदी निरभ्र असताना अचानक आकाशात उत्तरेकडून दक्षिणकडे जाणारे आगीचे गोळे दिसले. केवळ अकोला शहरातच नव्हे तर जिल्ह्यांमध्येही असाच नजारा पहावयास मिळाल्याची वार्ता पसरली. व्हिडीओ व्हायरल झाले. हा सर्व प्रकार शनिवारी रात्री घडला.