लखनऊ : प्रेयसीचं लग्न ठरलंय हे कळताच प्रियकराने तिच्याबरोबर विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उत्तर प्रदेशमधील इटावा जिल्ह्यातून ही घटना उघडकीस आली आहे. प्रेयसीच्या साखरपुड्याच्या दोन दिवस आधी दोघांनी विष प्राशन करून स्वतःला संपवलं.लग्नाला घरच्यांचा विरोध होता, तरुणीचं लग्न दुसरीकडे ठरलं. त्यानंतर दोघांनी सोबत आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला.मृत तरुण एका आठवड्यापूर्वीच जेलमधून जामिनावर बाहेर आला होता आणि आजोळी राहत होता. त्यानंतर गर्लफ्रेंडचं लग्न जमल्याचं कळताच त्याने तिच्याबरोबर आत्महत्या केली. पोलिसांनी दोघांचे मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवले आहेत.
4 जूनला होता मुलीचा साखरपुडा
या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी माहिती दिली की, इटावा येथील ऊसराहार पोलीस स्टेशन परिसरात मामे भाऊ आणि आत्ये बहीण यांनी विषप्राशन करून आत्महत्या केली आहे. मुलीचं लग्न ठरलंय हे समजल्यानंतर दोघांनीही हे आत्महत्येसारखं धक्कादायक पाऊल उचललं. दोन दिवसांनी मंगळवारी (4 जून रोजी ) मुलीचा साखरपुडा होणार होता. या गोष्टीमुळे नाराज झालेल्या या दोघांनी विषप्राशन केलं. त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं पण उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला.
शिकोहाबादमध्ये ठरलं होतं मुलीचं लग्न
प्रेमी युगुलाने विषप्राशन केल्याची माहिती मिळताच कुटुंबियांनी त्यांना रुग्णालयात दाखल केलं. पण उपचारांदरम्यान दोघांचा मृत्यू झाला. सरसई नावर येथील रहिवासी देवेंद्र कुमार यांची 18 वर्षीय मुलगी नेहा आणि त्यांचा भाचा 25 वर्षीय विश्राम सिंह यांच्यात अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध सुरू होते, असं पोलीस तपासात उघड झालं आहे. मुलीचं लग्न शिकोहाबाद इथं तिच्या कुटुंबीयांनी ठरवलं होतं. लग्नाच्याच काही कामासाठी मंगळवारी मुलीचे कुटुंबीय जाणार होते, हा प्रकार दोघांनाही कळताच दोघांनीही विषप्राशन करून आत्महत्या केली.
हुंडा प्रकरणात खुनाचा होता आरोप
मृत तरुण विश्राम सिंहच्या वहिनीने फेब्रुवारी महिन्यात गळफास घेऊन आत्महत्या केली होती, असं पोलीस तपासात उघड झालं आहे. यावरून महिलेच्या कुटुंबियांनी तिच्या सासुरवाडीकडील मंडळींनी हुंड्यासाठी तिचा खून केल्याचे आरोप करत तक्रार दिली होती. यात विश्राम सिंह, त्याचे वडील रामराज, आई बबली व भाऊ या सर्वांची तुरुंगात रवानगी करण्यात आली होती. मृत विश्राम हा 12 दिवसांपूर्वीच तुरुंगातून जामिनावर सुटला होता.
हे पण वाचा
- आजचे राशी भविष्य बुधवार दि. २७ नोहेंबर २०२४
- भरधाव वेगाने जाणा-या कारने रस्ता ओलांडत असलेल्या व्यक्तीस जोरदार धडक; उपचारादरम्यान मृत्यू.
- दोन गायी तीन गोवंश यांची निर्दयीपणे अवैध वाहतूक करणारे दोन वाहने जप्त. चौघांवर गुन्हा दाखल.
- वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात चालकासह एरंडोल येथील पायी चालणाऱ्याच्या मृत्यू.
- जळगावात ८ वर्षीय चिमुकलीला गळफास देऊन आईनेही संपविली जीवनयात्रा,पतीने फोडला हंबरडा.