Viral Video : सोशल मीडियावर दरदिवशी वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे अअसतात. सध्या लग्नसराई सुरू आहे. त्यामुळे सोशल मीडियावर लग्नातील अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत.कधी नातेवाईक लग्नात डान्स करताना दिसतात, तर कधी नवरदेव नवरी अनोख्या प्रथा निभवताना दिसतात. कधी लग्नातील मजेशीर किस्से व्हायरल होतात तर कधी नवरी नवरदेवाचे उखाणे चर्चेत येतात. सध्या असाच एक लग्नातील व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये नातेवाईक नाही तर चक्क नवरी सुंदर डान्स करताना दिसत आहे. नवरीचा डान्स पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.
नवरीने केला अप्रतिम डान्स
या व्हायरल व्हिडीओमध्ये नवरी सुंदर डान्स करताना दिसत आहे. नवरीने सुंदर लाल लेहेंगा घातला आहे आणि सुंदर डान्स स्टेप्स करत नवरी नाचताना दिसतेय. नवरीचा डान्स बघण्यासाठी तिच्या आजुबाजूला लोकांची गर्दी दिसतेय. ‘जान मेरी जान तेरे सदके तेरे सदके’ या लोकप्रिय गाण्यावर ती डान्स करताना दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि तिचा अप्रतिम डान्स पाहून लोक तिला प्रोत्साहन देताना दिसत आहे तर काही लोक या नवरीचा व्हिडीओ शूट करताना दिसत आहे. स्वत:च्या लग्नात नाचणाऱ्या या तरुणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
vishakhamishra022 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये ‘जान मेरी जान तेरे सदके तेरे सदके’ या गाण्याचे लिरिक्स लिहिलेय. या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, ‘जेव्हा नवरा आणि लेहेंगा दोन्ही आपल्या आवडीचा असतो तेव्हा..’ तर एका युजरने लिहिलेय, ‘मी पण माझ्या लग्नात असाच डान्स करणार’ आणखी एका युजरने लिहिलेय, ‘नवरी खूप सुंदर दिसत आहे’ या व्हिडीओवर अनेक युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत. अनेकांना या नवरीचा डान्स आवडला. एक युजर लिहितो, ‘आयुष्यात एवढा आत्मविश्वास असायला पाहिजे’
हे पण वाचा
- भरधाव वाहनाच्या ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या ३ मोटरसायकलींना चिरडलं ५ जणांचा मृत्यू एकाची प्रकृती चिंताजनक.
- डॉ.संभाजीराजे पाटील यांचा वाढत्या प्रतिसादेला जनतेची साथ
- मनसेला खिंडार – जिल्हा उपाध्यक्षांसह कार्यकर्ते शिवसेनेत दाखल नशिराबाद, चिंचोली व धानवड येथील कार्यकर्त्यांनी स्वीकारले गुलाब भाऊंचे नेतृत्व
- जळगाव लोकसभेच्या महिला आघाडीच्या समन्वयकपदी शितल चिंचोरे यांची निवड; शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाला सत्कार !
- आजचे राशी भविष्य शनीवार दि. २ नोहेंबर २०२४