मोदी कॅबिनेटचे ,3.0 खाते वाटप जाहीर, महत्त्वाचे खाते त्याच मंत्र्याकडे,खा. रक्षा खडसे यांना कोणते मंत्रालय मिळाले वाचा.

Spread the love

नवी दिल्ली:- नरेंद्र मोदी व त्यांच्या मंत्रिमंडळाची कालच शपथविधी पार पडला आणि आज खातेवाटप जाहीर झाले आहेत एनडीए NDA सरकारच्या मंत्रिमंडळात रावेर लोकसभेचे खासदार रक्षा निखिल खडसे यांच्याकडे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महत्त्वाच्या खात्यांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नसून अमित शहा यांच्याकडे पुन्हा गृहमंत्रिपद देण्यात आलं आहे. तर राजनाथ सिंह यांच्याकडे संरक्षण आणि एस जयशंकर यांच्याकडे परराष्ट्र मंत्रालय देण्यात आलं आहे.नितीन गडकरी यांच्याकडे पुन्हा एकदा रस्ते वाहतूक मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर निर्मला सीतारामन यांच्याकडे पुन्हा एकदा अर्थमंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे.

कुणाकडे कोणतं खातं….

नरेंद्र मोदी – पंतप्रधान

पेन्शन मंत्रालय (Ministry of Personnel, Public Grievances and Pensions)

अणूऊर्जा विभाग (Department of Atomic Energy)

अंतराळ विभाग (Department of Space)

महत्त्वाचे धोरणात्त्मक विषय आणि इतर मंत्रालये ज्याचे अद्याप वाटप करण्यात आलेले नाहीये. (All important policy issues; and All other portfolios not allocated to any Minister)

कॅबिनेट मंत्री

राजनाथ सिंह – संरक्षण मंत्री

अमित शहा – गृहमंत्री आणि सहकार मंत्री

नितीन गडकरी – रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री

जे. पी. नड्डा – आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री

शिवराज सिंह चौहान – कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री; आणि ग्रामविकास मंत्री

निर्मला सीतारामन – अर्थमंत्री आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री

एस. जयशंकर – परराष्ट्र व्यवहार मंत्री

मनोहर लाल खट्टर – ऊर्जा मंत्री आणि नगर विकास मंत्रालय

एचडी कुमारस्वामी – अवजड उद्योगमंत्री आणि पोलाद मंत्री

पीयूष गोयल – वाणिज्य आणि उद्योग मंत्री

धर्मेंद्र प्रधान – शिक्षण मंत्री

जीतन राम मांझी – सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री

राजीव रंजन सिंह ऊर्फ लालन सिंह – पंचायती राज मंत्री आणि मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री

सर्बानंद सोनोवाल – बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग

डॉ. वीरेंद्र कुमार – सामाजिक न्याय मंत्री

राममोहन नायडू – हवाई वाहतूक

प्रल्हाद जोशी – ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री

जुआल ओरम – आदिवासी व्यवहार मंत्री

गिरिराज सिंह – वस्त्रोद्योग मंत्री

अश्विनी वैष्णव – रेल्वे मंत्री; माहिती आणि प्रसारण मंत्री आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री

ज्योतिरादित्य शिंदे – दळणवळण मंत्री

भूपेंद्र यादव – पर्यावरण, वन आणि हवामान बदल

गजेंद्र सिंह शेखावत – सांस्कृतिक मंत्री आणि पर्यटन मंत्री

अन्नपूर्णा देवी – महिला आणि बाल विकास मंत्री

किरेन रिजिजू – संसदीय कामकाज मंत्री आणि अल्पसंख्यांक व्यवहार मंत्री

हरदीप सिंग पुरी – पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू

डॉ. मनसुख मांडविया – कामगार आणि रोजगार मंत्री; युवा कार्य आणि क्रीडा मंत्री

जी. किशन रेड्डी – कोळसा मंत्री आणि खाण मंत्री

चिराग पासवान – अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री

सी. आर. पाटील – जलशक्ती मंत्री

स्वतंत्र प्रभार असलेले मंत्री

इंद्रजित सिंग राव – नियोजन मंत्रालयाचे राज्यमंत्री आणि सांस्कृतिक मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)

डॉ. जितेंद्र सिंह – विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार, पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री, निवृत्ती वेतन मंत्रालयाचे राज्यमंत्री, अणूऊर्जा विभागातील राज्यमंत्री

अर्जुन राम मेघवाल – कायदा आणि न्याय मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि संसदीय कामकाद मंत्रालय राज्यमंत्री

प्रतापराव जाधव – आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार). आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे राज्यमंत्री

जयंत चौधरी – कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि शिक्षण मंत्रालयाचे राज्यमंत्री

राज्यमंत्री

हर्ष मल्होत्रा – परिवहन आणि रस्ते वाहतूक राज्यमंत्री
अजय टम्टा – परिवहन आणि रस्ते वाहतूक राज्यमंत्री
शोभा करंदालजे – एमएसएमई राज्यमंत्री
रामदास आठवले – सामाजिक न्याय मंत्रालय – राज्यमंत्री
मुरलीधर मोहोळ – सहकार आणि नागरी उड्डाण – राज्यमंत्री
रक्षा खडसे – क्रीडा आणि युवक कल्याण – राज्यमंत्री
श्रीपाद नाईक – गृहनिर्माण आणि ऊर्जा राज्यमंत्री
शांतनू ठाकूर – पोर्ट शिपिंग मंत्रालय – राज्यमंत्री

टीम झुंजार