पुणे :– मैत्रिणीसोबत असलेला वाद मिटवण्याच्या बहाण्याने बोलावून घेऊन 27 वर्षीय विवाहितेवर जबरदस्तीने बलात्कार केल्याची घटना हडपसर परिसरात घडली आहे. याप्रकरणी 27 वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार धाराशिव येथील एका युवकावर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत ब्रह्मदेव विठ्ठल मांजरे (वय-26 रा. परांडा जि. धाराशिव) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. फिर्यादी यांचे त्यांच्या मैत्रिणीसोबत वाद झाले होते. आरोपीने मैत्रिणीसोबत झालेले वाद मिटवण्यासाठी विवाहित महिलेला हडपसर येथे बोलावून घेतले होते. हडपसर येथे आल्यानंतर आरोपीने जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.
तसेच आरोपीने त्याच्या खोलीवर नेऊन महिलेसोबत संबंध ठेवून त्याच्या मोबाईलमध्ये व्हिडीओ व फोटो काढले. दरम्यान, ते फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार शारीरिक संबंध ठेवले. तसेच पतीची नोकरी घालवण्याची धमकी देऊन पतीवर खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमुद केले आहे. पुढील तपास हडपसर पोलीस करीत आहेत.
हे पण वाचा
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






